रत्नागिरी : प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटते. मात्र, १४५ आमदारांचा आकडा गाठल्याशिवाय काेणी मुख्यमंत्री हाेऊ शकत नाही. हा आकडा जाे गाठेल ताेच मुख्यमंत्री हाेईल, असे स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी रत्नागिरीत आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून हाेत आहे. याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले की, प्रत्येक माणसाला, पक्षाला आणि कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा असते. पण १४५ जाेपर्यंत हाेत नाही ताेपर्यंत काेणी मुख्यमंत्री हाेणार नाही. ज्या वेळी बेरीज हाेईल तेव्हा ते हाेईल.
शरद पवार आमचे नेतेचभविष्यात शरद पवारांसाेबत येणार का, यावर ते म्हणाले की, भविष्याचे काय माहीत नाही. तूर्तास आमचा रस्ता वेगळा आहे. आमचे ते नेतेच असून, परंतु विचारसरणी वेगळी आहे. आमची विचारधारा वेगळी आहे. आमचा राजकीय मनसुबा बदललेला आहे.
भुजबळांचा विराेध नाही
कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण मिळाले पाहिजे, असे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी यापूर्वीच सांगितले आहे. जे पात्र आहेत त्यांना दाखले देणेही सुरू झाले आहे. छगन भुजबळ यांचाही आरक्षणाला विराेध नाही. पण ओबीसींच्या वाट्याचे देऊ नका, अशी त्यांची मागणी आहे.