शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

लोकप्रतिनिधींविना योजना निराधार

By admin | Published: November 17, 2014 10:35 PM

लाभार्थीच नाहीत : शासनाचे ‘सहाय्य’ आहे, पण लाभार्थींसाठी ‘अर्थ’ नाही

रत्नागिरी : निराधार व्यक्तींना अर्थसहाय्य करणाऱ्या विशेष योजना शासनाकडून अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. या योजनांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. म्हणनूच आॅक्टोबर २0१४ अखेर या विशेष योजनांचा १ लाख ५५ हजारपेक्षा अधिक लाभार्थींना लाभ मिळाला आहे. मात्र, यासाठी अगदी ग्रामीण स्तरावरील लोकप्रतिनिधीच प्रयत्न करीत नसल्याने काही तालुक्यांमध्ये काही योजनांचे लाभार्थीच पुढे आलेले नाहीत. मंडणगडात तर विधवा निराधार निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ तसेच अपंग निवृत्तिवेतन योजनांचा एकही लाभार्थी नाही. शासनाच्या अनेक योजना लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे दिसून येत आहे. विशेष योजनेंतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य विनृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थीला दरमहा ६०० रूपये अनुदान देण्यात येते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिंचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रूपये इतके अर्थसहाय देण्यात येते.प्रशासनाच्या प्रयत्नामुळे या सहा योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यासाठी अगदी ग्रामीण स्तरावरून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मात्र, तसेच ते होताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना यांचे लाभार्थी असले तरी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना यासाठी प्रतिसाद कमी आहे. जिल्ह्यातील मंडणगड आणि संगमेश्वरात तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा एकही लाभार्थी नाही, तसेच तर मंडणगड आणि दापोली तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना यांचा एकही लाभार्थी नाही, तर मंडणगडमध्ये या तीन योजनांचा एकही लाभार्थी नाही. शासनाने या विशेष योजनांसाठी ‘जगणं’ नावाची योजनांविषयक सविस्तर माहिती असलेली एक पुस्तिका प्रसिद्धीसाठी केली आहे. ही पुस्तिका अगदी ग्रामपंचायत स्तरावर देऊनही ग्रामस्तरावरील लोकप्रतिनिधी या योजना आपल्या भागातील जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत बरेच उदासीन असलेले दिसून येतात. त्यामुळे अनेक योजना ग्रामीण भागात बारगळल्या आहेत. (प्रतिनिधी)विशेष निराधार योजनांचे जिल्ह्यातील लाभार्थी (तालुकानिहाय)तालुकामंडणगडदापोलीखेडचिपळूणगुहागरसंगमेश्वररत्नागिरीलांजाराजापूरएकूणसंजय गांधी३०७१२३६१३५१२११५१०३३१९३५१४९३८८८१२५५११६१३श्रावणबाळ५३२१९६४१६००२२८९१२२३२४२२१३५०९९८१७५८१४१३६वृद्धापकाळ४४९१३१३११५४१६१०८६११९७८८९३७१७१०९९१००७४कुटुंब लाभ०००४१३१७११०००८०५०८६८विधवा००३२१४१७९१९२१९४१३८९७६२९०८अपंग०००००२१७०६२९१११७०१८३एकूण१२८८४५४९४१३४६२२७३३२६६५५८३८९३२७२२४१८३३६८८२निराशा...मंडणगडात राष्ट्रीय कुटुंब लाभ, विधवा, अपंग योजनांचे लाभार्थीच नाहीत.स्थानिक लोकप्रतिनिधींमध्येही उदासीनता.प्रशासनाच्या प्रयत्नामुळे सहा योजनेच्या लाभार्थी संख्येत झाली वाढ.