गुहागर : गुहागर शहरातील वरचापाट, दुर्गादेवीवाडी येथे जमीन मालक उमेश भोसले यांच्या जागेमध्ये इमारत उभारणीचे सुरू असलेले काम हे विनापरवाना असल्याचे समोर आले आहे. या इमारतीच्या सांडपाण्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी खराब होणार असल्याची तक्रार येथील नगरसेवक सुधाकर सांगळे व नागरिकांनी गुहागर नगरपंचायतीकडे केली आहे. या तक्रारीनंतर मुख्याधिकारी यांनी हे बांधकाम त्वरित थांबविण्याची नोटीस दिली आहे. स्थानिक नगरसेवक सुधाकर सांगळे व दुर्गादेवीवाडीतील घोरपडेवाडी, सांगळेवाडी, जांगळेवाडी येथील नागरिकांनी हे काम थांबविण्याबाबत गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे सह्यांचे निवेदन दिले. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी हे बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे अशी नोटीस ठेकेदाराला दिली. परंतु, या नोटीसकडे दुर्लक्ष करत काम पुढे सुरूच ठेवण्यात आले आहे. या इमारतीच्या खालच्या बाजूला सार्वजनिक विहीर असून, या विहिरीवर येथील तीन वाड्यांचा पाणीपुरवठा अवलंंबून आहे. नळपाणी योजनेच्या पाण्याला पर्याय म्हणून या विहिरीतील पाण्याचा वापर या वाड्यांमधील ग्रामस्थ करतात. गुहागर नगरपंचायतीचा रस्ता हा सध्या काम सुरू असलेल्या इमारतीच्या जागेतून गेला आहे. या जमिनीतून जाणारा रस्ता हा २६ नंबरला नोंद असूनही या रस्त्याची जागा न सोडता या सर्व जमिनीची बिनशेती करण्यात आली असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या इमारतीच्या कामासाठी कोणताही
विनापरवाना इमारत बांधकामाला नोटीस
By admin | Published: June 21, 2016 9:33 PM