चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छ भारत अभियान संदेशानुसार शहर व परिसर स्वच्छ करण्यावर नगर परिषद प्रशासनाच्या आरोग्य विभागाने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. कचरा टाकणारे व्यापारी, भाजीविक्रेते, फेरीवाले व नागरिक यांच्यावर आता करडी नजर ठेवली जाणार आहे. यासाठी पालिका प्रशासनातर्फे खास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.चिपळूण नगर परिषदेने यापूर्वीही संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात भाग घेऊन बक्षिसेही मिळवली आहेत. आपले घर व परिसर स्वच्छ ठेवल्याने आरोग्यही स्वच्छ राहाते, याची जाणीव सर्व स्तरावरील नागरिकांना होणे काळाची गरज आहे. यापूर्वी नगर परिषद प्रशासनाने प्लास्टिकविरोधी मोहीमही राबवली असून, यापूर्वी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर कचरा टाकणारे व्यापारी, फेरीवाले, नागरिक यांच्यावर नजर ठेवण्यासाठी आता नगर परिषद प्रशासनाने पथकाची नेमणूक केली आहे. आवश्यक भागात हे पथक केव्हाही पाहणी करणार आहे. कचरा टाकताना कोणीही आढळल्यास त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जनजागृती करणाऱ्या साडेसहा हजार पत्रकांचे घरोघरी वाटप करण्यात येणार आहे.पाण्याचे स्त्रोत व गटारात कचरा टाकू नये, घंटागाडीतच कचरा द्यावा, असे आवाहन नगर परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)कचऱ्याबाबत नगर परिषद गंभीरचिपळूण शहरात ३५ ते ४० मटण विक्रेते आहेत. त्यांंच्यासाठी मच्छी मार्केट बांधण्यात आले आहे. मात्र, हे मार्केट अद्याप सुरू न झाल्याने वेगवेगळ्या ठिकाणांहून कोंबड्यांचे अवशेष व अन्य कचरा नियमित उचलणे संबंधित विभागाला अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे हे मटण मार्केट सुरू झाल्यास येथील कचऱ्यासाठी स्वतंत्र जागा देऊन हा कचरा उचलणे शक्य होणार आहे. यादृष्टीने नगर परिषद प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे हेच महत्त्वाचे आहे. काही वेळ मटण व मच्छी विक्रेते परिसरात कचरा टाकत असल्याचे चित्र आहे. तीच स्थिती भाजी मंडईची आहे.चिपळूण नगर परिषद आरोग्य विभागातर्फे पथकाची नेमणूक.प्लास्टिकविरोधी मोहिमेत सहभाग दर्शवण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन.कचरा टाकणारे व्यापारी, भाजीविक्रेते, फेरीवाले, नागरिक यांच्यावरही होणार फौजदारी गुन्हा.साडेसहा हजार जनजागृती पत्रकांचे घरोघरी वाटप होणार.स्वच्छ चिपळूण, सुंंदर चिपळूण करण्याचा संकल्प.दर शुक्रवारी कार्यालयात खातेप्रमुख, कर्मचारी करणार स्वच्छता.
...आता नजरेची भाषा!
By admin | Published: November 18, 2014 9:36 PM