लांजा : तालुक्यात गेले तीन दिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने घट झाल्याने तालुकावासीयांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यामध्ये शुक्रवारी एका दिवसामध्ये कोरोनाचे केवळ १९ रुग्ण आढळले. सध्या तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १,७४९ झाली असून, ३९१ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत़
गेला महिनाभर तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये माेठ्या प्रमाणात वाढ होत होती. त्यामुळे तालुकावासीयांची चिंता वाढली होती. मात्र, गेले तीन दिवस कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी आलेल्या अहवालामध्ये कोरोना अँटिजनचे १० तर आरटीपीसीआरचे ९ असे एकूण १९ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. यामध्ये भांबेड १, कोर्ले २, लांजा शहर ३, आसगे शिंदेवाडी १, वाकेड गवाणकरवाडी १, लांजा सार्दळवाडी १, लांजा नामदेवनगर १, आगवे जोशीगाव १, माजळ १, हर्दखळे १, वाकेड बरामवाडी १, वेरवली चव्हाणवाडी १, धुंदरे १, लांजा वैभववसाहत १, लांजा न्यू बाजारपेठ २ या रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील १,२८३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ७५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.