रत्नागिरी : कोकण विभागीय आयुक्तांकडून जिल्ह्यातील पाच नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आली असून, ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. राजापूरवगळता उर्वरित चार नगरपरिषदांमध्ये एक जागा अनुसूचित जातींकरिता आरक्षित ठेवण्यात आली आहे. तसेच लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या निश्चित करण्यात आल्याने चिपळूण व रत्नागिरीत प्रत्येकी दोन नगरसेवक वाढणार आहेत.रत्नागिरी नगरपालिकेत सध्या २८ नगरसेवक आहेत. येत्या निवडणुकीपासून ही संख्या ३० होणार आहे. त्यातील १५ जागा महिलांसाठी आहेत. त्यापैकी ११ सर्वसाधारण, ४ इतर मागासवर्ग अशी महिला सदस्यसंख्या राहणार आहे. पुरूषांसाठी असलेल्या १५ जागांपैकी सर्वधारण १०, इतर मागासवर्ग ४ आणि अनुसूचित जातीसाठी राखीव १ अशी सदस्य संख्या असणार आहे. सर्वसाधारण पद पुरूष व महिलांसाठी चिठ्ठीद्वारे काढण्यात येणार आहे.चिपळूण पालिकेत सध्या २४ नगरसेवक असून, २ जागा वाढणार आहेत. १३ जागा महिलांसाठी आरक्षित असून, त्यात सर्वसाधारण ९, इतर मागासवर्ग ४ असा समावेश आहे. तर पुरूषांमध्ये सर्वसाधारण ९, इतर मागासवर्ग ४, अनुसूचित जातींसाठी १, सर्वसाधारणसाठी ८ पदे राखीव आहेत. गतवेळी ही पदे महिला राखीव होती. खेड नगरपालिकेमध्ये एकूण १७ जागांपैकी महिलांना ९ जागा आरक्षित असून, ५ सर्वसाधारण, ३ इतर मागासवर्ग आणि एक अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. पुरूषांच्या आठ जागांपैकी २ इतर मागासवर्ग आणि ६ सर्वसाधारण अशी विभागणी आहे.दापोली नगरपालिकेतील १७पैकी ६ सर्वसाधारण आणि ३ इतर मागासवर्गीय अशा ९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पुरूषांसाठीच्या आठ जागांमध्ये २ इतर मागासवर्ग, ५ सर्वसाधारणसाठी राखीव असल्या तरी यात ३ जागा पुन्हा महिलांसाठी राखीव आहेत, तर खुल्या प्रवर्गासाठी ६ जागा राखीव आहेत. एक अनुसूचित सर्वसाधारणसाठी राखीव आहे. राजापूर नगरपालिकेतील एकूण १७ जागांपैकी ९ महिलांसाठी. त्यातील ६ सर्वसाधारण, ३ इतर मागासवर्ग तसेच पुरूषांसाठी २ इतर मागासवर्ग आणि ६ सर्वसाधारण अशी विभागणी आहे.रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली आणि राजापूर या पाच नगरपालिकांमध्ये ५० टक्के महिला निवडून जाणार आहेत. ४ अनुसूचित जातीमधील, तर सर्वसाधारणमधील ३५ उमेदवार अशी सदस्यसंख्या राहणार आहे.अनुसूचित जातीसाठी यावेळी एक जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. रत्नागिरीत चिठीद्वारे या प्रवर्गातून महिला की पुरूष हे ठरविण्यात येणार आहे. मागील वेळी चिपळूणमध्ये अनुसूचित महिलेसाठी राखीव असल्याने यावेळी सर्वसाधारण (महिला अथवा पुरूष) असे राहणार आहे. तसेच दापोलीतही यावेळी सर्वसाधारणसाठी राखीव राहणार आहे. खेडमध्ये यावेळी महिलांकरिता राखीव ठेवण्यात येईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
पाच नगरपालिकांमधील सदस्यसंख्या निश्चित
By admin | Published: May 26, 2016 10:00 PM