रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या वयोगटातील एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदार ६२ टक्के असून पुरुष मतदार ३८ टक्के आहेत. तर एकूण मतदारांच्या तुलनेत ज्येष्ठ महिला मतदारांची संख्या १.१३ टक्के आहे. या मतदारसंघात ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची एकूण संख्या २६,१८१ आहे. यात महिलांची संख्या १६,३१९ तर पुरुष ९,८६२ आहेत.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात ४० वयोगटापासून पुढे सर्वच सामान्य महिला मतदारांची आकडेवारी पुरुष मतदारांपेक्षा अधिक आहे. एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदारांपैकी पुरुष मतदार ७ लाख ८ हजार ४८७ तर महिला मतदार ७ लाख २९ हजार ९७३ आहेत. परंतु ८५ वर्षांवरील वयोगटातही महिलांची संख्या अधिक आहे.या गटातील मतदारांची एकूण संख्या २६,१८१ आहे. यात महिलांची संख्या १६,३१९ असून पुरूष मतदार ९,८६२ आहेत. म्हणजेच ८५ वर्षांवरील महिलांची संख्या तब्बल ६२ टक्के तर पुरुष मतदार केवळ ३८ टक्के इतके आहे. एकूण १४ लाख ३८ हजार ४७१ मतदारांच्या तुलनेत ८५ वर्षांवरील महिलांची संख्या १.१३ टक्के तर पुरुषांची संख्या ०.६ टक्के इतकी आहे. एकंदरीत ही आकडेवारी पाहता पुरुषांपेक्षा महिलांचे आयुर्मान अधिक वाढलेले असल्याचे दिसून येते. ४० वर्षांवरील वयोगटातील महिलांचीही संख्या पुरुषांच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसते.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातही ८५ वर्षांवरील महिला मतदार पुरुषांच्या तुलनेत अधिक आहेत. त्याचप्रमाणे एकूण मतदारांच्या तुलनेत या महिला मतदारांची संख्या १.१३ टक्के तर पुरुषांची संख्या ०.६ टक्के आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महिलांची संख्या अधिक
By शोभना कांबळे | Published: April 17, 2024 3:20 PM