शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

रूग्णांची संख्या वाढली; डॉक्टरांची घटली

By admin | Published: September 17, 2016 10:10 PM

जिल्हा रुग्णालय : वातावरणातील बदलामुळे आजारांना बळ

रत्नागिरी : सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे साथीच्या आजारांना बळ मिळाले आहे. गेले दोन दिवस जिल्हा शासकीय रुग्णालय रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहे. परंतु, या रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर व तज्ज्ञांची संख्या कमी आहे. एका बाजूला रुग्णांचा संख्येत वाढ होतेय तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांची संख्या घटताना दिसत आहे. फिजिशीयन डॉक्टरांचा शोध डोकेदुखी ठरत आहे.हायटेक होण्याचा मार्गावर असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला सध्या अनेक समस्यांनी घेरले असल्याचे दिसत आहे. डॉक्टरांची समस्या, तज्ज्ञ नाही तसेच अन्य अत्यावश्यक सुविधाही बंद असल्याने रुग्णांना रिपोर्ट करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे अत्यंत कमी मनुष्यबळात शासकीय रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. परंतु, याचा त्रास मात्र रुग्णांना होत आहे. त्याबरोबर डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त कामकाज करावे लागत आहे.गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी साथीच्या आजारांना बळ मिळाले आहे. त्यामुळे रुग्णाचा संख्येतही दुप्पटीने वाढ झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाची २०० रुग्णांची क्षमता आहे. मात्र, सध्या याठिकाणी २१२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे काही रुग्णांवर जमिनीवर बेड टाकून उपचार केले जात आहेत. अपुऱ्या डॉक्टर संख्येमुळे रुग्णांचे हाल होत आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३० पदे भरण्यात आली आहेत. परंतु, त्यातील ८ डॉक्टर गैरहजर तर २ निलंबित आहेत. त्यामुळे केवळ २० डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. येथे तज्ज्ञ डॉक्टरांचा तुटवडा जाणवत असून, १९ पदे मंजूर असताना तब्बल १४ पदे अद्यापही रिक्त आहेत. निव्वळ ५ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांमागे धावपळ करावी लागत आहे. त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचाही समावेश आहे. (वार्ताहर)अपुऱ्या संख्येतही चांगल्या सेवेचा प्रयत्नजिल्हा शासकीय रुग्णालयात ४० टक्के मनुष्यबळ असतानासुध्दा येथील डॉक्टर व कर्मचारी जोमाने काम करत आहेत आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांकडून त्याबाबत फार मोठ्या तक्रारी आलेल्या नाहीत.