शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

रत्नागिरी जिल्हा परिषदेत उद्यापासून पोषण माह, ३० सप्टेंबरपर्यंत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 4:49 PM

केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहिला व बालविकास विभागातर्फे विविध कार्यक्रममहिला, मुलींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत राबविणार उपक्रम

रत्नागिरी : केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार दिनांक ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला व मुलींसाठी विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पोषण आपल्या घरी कार्यक्रमांतर्गत अन्नदानाचे महत्त्व कळावे यासाठी ७ रोजी मूठभर धान्य प्रत्येक घरामधून जमा करणे व जमलेल्या धान्यातून विविध पाककृती तयार करुन या पाककृतींचे प्रात्यक्षिक बालकांच्या मातांना दाखवणे, बाळगोपाळांची पंगत आयोजित करणे, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वयंसहाय्यता बचतगट यांची एकत्रित आयवायसीएफ आणि चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत लोकजागृती होण्याकरिता एकत्रित गृहभेट देणे, असे उपक्रम आरोग्य विभागाच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहेत.११ रोजी ग्रामत्रिसुत्री कार्यक्रमांतर्गत ग्रामआरोग्य, स्वच्छता, तसेच पोषण दिवसचे आयोजन आरोग्य विभागाच्या सहकार्याने केले जाणार आहे. २१ रोजी पोषण आॅलिम्पीयाड या उपक्रमाचे आयोजन महिला व बालविकास विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे केले जाणार आहे.२५ रोजी पोषणाची वारी कार्यक्रमांतर्गत प्रभातफेरी, एएनएम, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, स्वयंसहाय्यता बचतगट यांची एकत्रित आयवायसीएफ आणि चांगल्या आरोग्याच्या सवयीबाबत लोकजागृत्ती होण्याकरिता एकत्रित गृहभेट देणे, ० ते ६ वयोगटातील बालकांचे वजन घेणे व छाननी करणे, किशोरवयीन मुलींकरिता जनजागृती शिबिराचे आयोजन, स्त्रियांविषयी असलेल्या कायद्यांबाबतची माहिती देणे, असे उपक्रम महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक, आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता विभागांमार्फत राबविण्यात येणार आहेत.२७ रोजी भाजीपाला परसदारी कार्यक्रमांतर्गत रिलायन्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने परसबागांची निर्मिती करणे, स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थांपासून बायोगॅस युनिट बसविणे असे उपक्रम महिला व बालविकास विभागातर्फे राबविण्यात येणार आहेत. २९ रोजी पोषण सारांश कार्यक्रमांतर्गत पोषण महिना म्हणून संपूर्ण महिनाभरात केलेल्या कामकाजाचा अहवाल फोटोसह एकत्रित करुन हा प्रकल्प अहवाल वरिष्ठस्तरावर सादर करण्यात येणार आहे.विविध उपक्रम राबविले जाणार

  1. केंद्र शासनाने सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत महिला व मुली यांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने पोषण माहच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 
  2. पोषण दिवस कार्यक्रमांतर्गत ११ रोजी बालकांची आरोग्य तपासणी, किशारवयीन मुलींची एचबी तपासणी, बीएमआयची माहिती देणे. महिला व मुलींसाठी आयुषमार्फत योगाचे प्रशिक्षण घेतलेल्या किशोरी मुलींमार्फत योगाचे, ज्युडो कराटे कार्यक्रमाचे आयोजन करणे असे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. 
  3. १३ ते २३ सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत पोषणाचा श्रीगणेशा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत कुपोषण निमूर्लन, माझी कन्या भाग्यश्री, बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनांचे फलक लावणे तसेच गणेशोत्सवात या विषयांचे देखावे सादर करणे, असे उपक्रम यादरम्यान राबविण्यात येणार आहेत.
टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासRatnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद