देवरुख : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने संगमेश्वर तालुक्यातील शिवने गावातील एकाला पाच जणांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता संगमेश्वर येथे घडली. मारहाण करणारे ५ आणि पोस्ट करणारा, अशा एकूण सहा जणांवर संगमेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना गुरुवारी देवरुख न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंबद्दल विवेक चव्हाण (रा. शिवने, संगमेश्वर) याने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकला हाेता. त्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण (रा. कडवई), अनुराग कोचिरकर, शेखर नलावडे, सनी प्रसादे, सलमान अल्लीहुसेन बोदले (सर्व रा. देवरुख) यांनी विवेकला साई मेडिकलमध्ये घुसून शिवीगाळ करत मारहाण केली.
या मारहाणप्रकरणी संगमेश्वर पोलीस स्थानकात भारतीय दंड विधान कलम १४३, १४५, १४७, १४९, ४५२, ५०४, ५०६, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३), ११०, ११७, ११२/११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना गुरुवारी सायंकाळी देवरुख येथील न्यायालयात हजर केले. अधिक पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक प्रशांत शिंदे करीत आहेत.आदेशाचे उल्लंघनन्यायालयाने विवेक चव्हाण याला १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मारहाण करणाऱ्या ५ जणांनी बेकायदेशीर जमाव करून दुकानात घुसून मारहाण केली व सार्वजनिक शांतता भंग करत मनाई आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.