रत्नागिरी : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना निसर्ग चक्रीवादळामुळे सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये दाखल झाले आहेत. या पथकाकडून गावांची पाहणी करण्यात येत आहे.चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भेटी देण्यासाठी दापोलीचे प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, तसेच आपत्ती व्यवस्थापनचे पथक रवाना झाले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील गावांना भेटी देण्यासाठी व वादळापूर्वीची परिस्थिती हाताळणे करिता थेट गावांमध्ये दाखल झाले आहेत.मंगळवारी दिवसभरात केळशीपासून थेट दाभोळपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या गावांना भेटी देऊन त्या त्या ठिकाणच्या ग्राम कृती दल, ग्रामस्थ यांची भेट घेण्यात आली. यावेळी कच्ची घरे, समुद्रकिनाऱ्यालगतची घरे याची पाहणी करून धोकादायक असलेल्या घरांतील लोकांना तत्काळ इतरत्र हलविण्यात येणार आहे. त्यांची व्यवस्था शाळेत किंवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे करण्यात येणार आहे.
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी गाव भेटीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 1:51 PM
रत्नागिरी तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावांना निसर्ग चक्रीवादळामुळे सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचे पथक तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्ये दाखल झाले आहेत. या पथकाकडून गावांची पाहणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी गाव भेटीवरदापोलीतील समुद्रकिनाऱ्यावर सावधानता, पथकांकडून गावांची पाहणी