शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

जुनाट जलवाहिन्या हीच समस्या...!

By admin | Published: February 09, 2015 11:05 PM

महत्त्वाचे शहर : पाणी व्यवस्थापनाची यंत्रणाच कोलमडली

प्रकाश वराडकर - रत्नागिरी -विस्तारणारे, प्रगतीकडे झेपावणारे कोकणातील एक महत्त्वाचे शहर अशी ओळख असलेल्या रत्नागिरी शहरात गेल्या चार वर्षांच्या काळात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. धरणांत मुबलक पाणी आहे, परंतु ते शहरवासीयांना मिळण्यात अडचणी आहेत. शहरवासीयांना पाण्याचे वितरण करणारी व्यवस्थाच कोलमडली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शहरांतर्गत जुनाट झालेल्या सर्वच जलवाहिन्या बदलण्याची आवश्यकता आहे. त्यानंतरच धरणांमध्ये असलेले मुबलक पाणी शहरवासीयांच्या मुखात जाणार आहे. रत्नागिरी शहराची लोकसंख्या ७७ हजारांवर आहे. तसेच हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने दररोज तालुक्यातून, जिल्ह्यातून कामानिमित्त येणाऱ्या तसेच जिल्हा राजधानीत नोकरीस असलेल्या व शहराच्या बाहेर राहणाऱ्या लोकांची संख्या आणखी काही हजारांवर आहे. या अधिकच्या लोकसंख्येचा भारही रत्नागिरीवर आहे. त्यामुळे सुमारे सव्वा लाख लोकांच्या रत्नागिरी शहरात पाण्याची व्यवस्था अतिशय उत्तम असण्याची आवश्यकता आहे. मात्र, गेल्या चार ते पाच वर्र्षांच्या काळात नगरपरिषदेत अपवादवगळता केवळ राजकारणच झाले. त्यामुळे नागरिक टाहो फोडत असतानाही त्यांच्या पाण्याची समस्या मात्र सुटू शकली नाही. उलट ही समस्या दरवर्षी अधिकाधिक वाढत आहे.रत्नागिरी शहराला शीळ धरण, पानवल धरण, नाचणे तलाव व एमआयडीसी यांच्याकडील पाण्याचा शहराला पुरवठा केला जातो. दररोजची शहराची पाण्याची गरज ही १४ ते १५ दशलक्ष लीटर्स (एमएलडी)ची आहे. शीळ धरणातील जॅकवेलमधून दररोज १० ते ११ एमएलडी पाणी साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्रात आणून शुध्दिकरण केले जाते. त्यानंतर ते शहरवासीयांना पुरविले जाते. हे पाणी रत्नागिरीत आणण्यासाठी नगरपरिषदेला दर महिन्याला १७ लाख वीजबिल भरावे लागते. पानवल धरणातून दीड ते पावणेदोन एमएलडी पाणी शहरात येते. हे पाणी गुरुत्त्वाकर्षण पध्दतीने येत असल्याने त्यासाठी विजेचा खर्च येत नाही. शहराजवळच असलेल्या नाचणे येथील तलावाचे पाणीही शहराला काही प्रमाणात उपलब्ध होते. तसेच एमआयडीसीकडून शहराच्या काही भागासाठी दीड एमएलडी पाणी घेतले जाते. त्यामुळे शहरवासीयांसाठी या धरणांमध्ये मुबलक पाणी आहे. परंतु ते त्यांच्यापर्यंत पोहोचविणाऱ्या जलवाहिनीचे जाळेच कमकुवत, जुनाट झाले आहे. दररोज शहरातील काही भागात जलवाहिनीतील दोषामुळे पाणी न येणे, कमी दाबाने पाणी येणे, जलवाहिनी फुटणे हे प्रकार घडतात व तेथील महिलावर्ग पाणी नाही म्हणून थेट नगरपरिषदेच्या कार्यालयावर धडक देतात. यावर्षीही ही स्थिती निर्माण झाली असून, जलवाहिन्याच एवढ्या गंजलेल्या आहेत की त्या कधी कुठे फुटतील, याचा नेम नाही. त्यामुळे आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावणार अशी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची स्थिती झाली आहे. समस्या दूर होणार?शासनाच्या सुजल निर्मल योजनेतून गेल्या वर्षभराच्या प्रयत्नांनंतर आता कुठे पाणी वितरणातील त्रुटी दूर करण्यासाठी, पाण्याची स्थिती भक्कम करण्यासाठी नगरपरिषदेला ५७ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातील साडेआठ कोटी रुपये हे पानवल धरणाच्या दुरुस्तीसाठी खर्च केले जाणार आहेत. शीळ धरणातील ५० टक्केच पाणी रत्नागिरी शहराला मंजूर होते ते आता शंभर टक्के मिळणार आहे. तसेच शीळ धरणातील जॅकवेल २००५ मध्ये काही कारणाने खचली असून, या जॅकवेलची दुरुस्तीही शासनाच्या येणाऱ्या निधीतून केली जाणार आहे. खरेतर नव्याने जॅकवेल उभारण्याची गरज असून, स्वतंत्रपणे निधी मिळाल्यावर नवीन जॅकवेल उभारली जाणार आहे. जुनाट जलवाहिन्या बदलणार...रत्नागिरी शहरातील जुने झालेले अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळेही येत्या सहा महिन्यांच्या काळात शासनाच्या निधीतून बदलले जाणार आहे. त्यामुळे वितरणातील अनेक दोष आपोआपच कमी होणार आहेत. शीळ धरणापासूनची दोन किलोमीटर अंतराची जलवाहिनीही शासनाकडूून मिळणाऱ्या ५७ कोटी रुपयांच्या निधीतून बदलली जाणार आहे. येत्या वर्षभराच्या काळात रत्नागिरीवासीयांची पाण्याची समस्या बहुतांश सुटेल, असा विश्वास नगरपरिषदेच्या पाणी विभागाचे अधिकारी चंद्रकांत गमरे यांनी व्यक्त केला.