शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

पुन्हा एकदा पूर्णवेळ विद्यार्थी झालो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:27 AM

दि. २२ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा झाली. डॉक्टर असल्यामुळे हा लॉकडाऊन कमीत कमी दोन-तीन महिने तरी चालणार याचा ...

दि. २२ मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा झाली. डॉक्टर असल्यामुळे हा लॉकडाऊन कमीत कमी दोन-तीन महिने तरी चालणार याचा अंदाज आला होता. माझी मनोविकारांची ओपीडी असल्यामुळे व जनरल पेशंट पाहत नसल्यामुळे पुढचे दोन-तीन महिने कदाचित बसून राहावे लागणार याचा अंदाज आला होता. सर्वांप्रमाणे माझ्याही मनात आता काय करायचे, हा प्रश्न पडला होता. आराम करायचा किंवा रिलॅक्स करायचा तरीही तो दिवसभर कसा करणार आणि त्यातही मुळातच शांत बसायची सवय नसलेला स्वभाव. सुरुवातीचे दोन-चार दिवस आराम केला, टीव्ही पहिला; परंतु दोन-चार दिवसांतच त्याचा कंटाळा आला. मग ठरवले, एवढे दिवस ज्या गोष्टी बिझी शेड्युलमुळे व वेळेअभावी करायच्या राहत होत्या किंवा व्यवस्थित त्यासाठी वेळ देऊ शकत नव्हतो त्या गोष्टी करायला घ्यायच्या. त्या गोष्टींसाठी वेळ द्यायचा. आराम करण्याऐवजी अशा गोष्टी शिकायच्या, ज्या आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातील. मनाला आनंद देण्यासोबतच माझ्या वैयक्तिक पातळीवर, व्यावसायिक पातळीवर तसेच आर्थिकदृष्ट्या मला पुढच्या पातळीवर घेऊन जातील आणि मग अशा गोष्टींची लिस्ट बनविली. लिस्ट बरीच मोठी होती; कारण बऱ्याच गोष्टी शिकायच्या होत्या, बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या; परंतु वेळ कमी आहे याचीही जाणीव होती व सर्वच गोष्टी करायच्या म्हटले तर सर्वच अर्धवट झाले असते आणि त्यामध्ये ओढाताणही झाली असती. त्यामुळे त्यांतील फक्त चारच गोष्टी करायच्या ठरल्या. त्या होत्या १) आर्थिक स्वावलंबनासाठी शिक्षण २) पेंटिंग ३) वाचन ४) व्यायाम.

पुढचे काम होते त्याचे शेड्युल बनवणे. अगदी नवोदयला शाळेत होतो त्याप्रमाणे टाइमटेबल बनविले; कारण आता कुठल्याही गोष्टी कंपल्सरी नसल्यामुळे पूर्ण वेळ विद्यार्थ्यासारखा होता आणि हीच वेळ होती पूर्णवेळ विद्यार्थी होण्याची. दिवसभराचे वेळापत्रक ठरविले. अगोदरपासून सकाळी पाच वाजता उठण्याची सवय होतीच; पण ती आता चार वाजता केली. एक तास अतिरिक्त मला पहाटे स्वत:साठी मिळणार होता. पहाटे चार वाजता उठून ४.३० पर्यंत सर्व गोष्टी उरकून घ्यायचो व ४.३० ते ४.४५ पर्यंत मेडिटेशन, ध्यानधारणा करायचो. मग ४.४५ ते ६.०० पर्यंत स्वयंविकास किंवा सेल्फ मोटिव्हेशनसंबंधित पुस्तके वाचायचो; तर ६ ते ७.३० मनोविकार व लैंगिक समस्या या विषयाची पुस्तके वाचायचो. ७.३० ते ९.०० या. वेळेत व्यायाम करायचो. मग परत सकाळी १० ते १ व २ ते ५ हा वेळ पेंटिंगसाठी. सायंकाळी ५ ते ८ पर्यंत आर्थिक स्वावलंबन शिकण्यासाठी. सुरुवातीचे २ दिवस हे करणे कठीण जात होते; कारण एवढा वेळ एका ठिकाणी बसायची सवय राहिली नव्हती; परंतु नंतर-नंतर मजा यायला लागली, आनंद मिळायला लागला व खूप काही शिकायलाही मिळाले.

वाचनाची आवड तशी पहिल्यापासूनच होती; परंतु अगोदर काय वाचायचे हे कळत नव्हते. भेटेल ते पुस्तक घेऊन वाचायचो; परंतु मागील २ वर्षांत कुठली पुस्तके वाचायची व कशी वाचायची कळायला लागले होते. सोबतच नेपोलियन हिल, अँथोनी रॉबिल्स, स्टेफन कोवे, डेल कानेर्गी अशा विविध इंटरनॅशनल लेखकांबद्दल माहिती झाली होती व त्यांची पुस्तके वाचण्यात आली होती. स्वयंविकासासंबंधी तसेच यशस्वी आयुष्याविषयीची अनेक पुस्तके इङ्म१ल्ल ळङ्म ह्रल्ल या कार्यक्रमासाठी वाचण्यात येत होती व अशी जवळपास २०० पुस्तके मागील दोन वर्षांत विकत घेतलेली होती; परंतु वाचायला जास्त वेळ किंवा सलग वेळ मिळत नसे. परंतु लॉकडाऊनमुळे वेळ भेटला आणि दोन ते तीन महिन्यांत जवळपास १८-२० पुस्तके वाचून झाली. काही जुनी पुस्तकेही परत वाचण्यात आली. वाचनाने विचार प्रगल्भ होत जातात, नवनवीन वाटत सापडत जातात, स्वत:चा शोध घायला मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने वाचायलाच हवे या मताचा मी आहे. परंतु काय वाचताय हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जसे शरीरासाठी चांगले अन्न खावे लागते तसेच मनासाठी चांगली पुस्तके वाचणे गरजेचे असते. जेफ केलर यांचे Attitude is everything आणि रॉबिन शर्मा यांचे The 5 AM Club ही या काळात वाचण्यात आलेली सर्वांत उत्तम पुस्तके. कदाचित सर्वांनीच वाचावीत अशी. आता सर्व सुरक्षित व पूर्ववत चालू होत असताना वेळ कमी भेटतो तरीही सकाळी कमीत कमी अर्धा तास Motivational पुस्तके वाचण्याची सवय मात्र अजून चालू आहे.

व्यायाम - लॉकडाऊनअगोदर जिम चालूच होती; पण त्यात सातत्य नव्हते. बाहेरगावच्या पेशंट तपासण्यासाठीच्या भेटीमुळे व्यस्त वेळेतून रोज वेळ काढणे अवघड जायचे. आठवड्यातून जेमतेम तीन-चार दिवसच वेळ मिळायचा; तोही अर्धा ते पाऊण तास. लॉकडाऊनमध्ये मात्र तो जवळपास दीड तास मिळायला लागला; परंतु जिम बंद असल्यामुळे व वॉकिंगलाही बाहेर जाता येत नसल्यामुळे थोडा प्रश्न होता. यूट्यूबवरून व्यायामाचे काही व्हिडिओ डाऊनलोड करून घेतले व घरीच व्यायाम चालू केले. रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम असल्यामुळे कंटाळाही येत नव्हता. काही वेळा तर चक्क झुंबा डान्सचे व्हिडिओ वापरले. त्यामुळे फिटनेससाठी व्यायाम तर झालाच; पण छान एंजॉयही करता आला. इतर लोकांचे लॉकडाऊनमध्ये अती खाऊन वजन वाढत असताना मला मात्र माझे तीन महिन्यांत जवळपास चार किलो वजन कमी करता आले. शरीराच्या तंदुरुस्तीसोबत मनालाही फ्रेश वाटू लागले. स्वत:साठी व स्वत:च्या आरोग्यासाठी रोज प्रत्येकाने कमीत कमी ३०-४० मिनिटे काढायलाच हवीत. आपण बऱ्याच वेळा वेळ नाही या बहाण्याने व्यायाम करणे टाळतो किंवा पुढे ढकलतो. मोबाईल, टी.व्ही. या गोष्टींतील वेळ कमी केला तर यासाठी नक्कीच त्याचा सदुपयोग करता येऊ शकतो व आपले शरीर व मन सुदृढ ठेवून जीवन सुंदर करता येऊ शकते.

आर्थिक स्वावलंबन / शेअर मार्केटचा अभ्यास

लॉकडाऊनमधील सर्वांत मोठी जमेची बाजू ठरली, ती म्हणजे आर्थिक स्वावलंबनासाठी शेअर मार्केटचा अभ्यास. नुकतेच मार्च २०२० मध्ये आर्थिक स्वावलंबन व त्यासाठी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, इत्यादी गोष्टींचे महत्त्व कळायला लागले होते आणि आता लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ वाचायला मिळायला लागला. रोज जवळपास तीन-चार तास शेअर मार्केटविषयी वाचनात जायचे. खूप सखोल अभ्यास करता नाही आला तरी बऱ्यापैकी स्वत:चा पोर्टफोलिओ मॅनेज करता येईल; तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक इतर गोष्टी, बचतीचे मार्ग, इत्यादी विविध गोष्टी शिकता आल्या. आता स्वत:चे पोर्टफोलिओ मॅनेज तर करतोच आहे. इतरांना पण त्याविषयीं सल्ला देतो आहे. पोर्टफोलिओ मॅनेज करायला मदत करतो आहे. शेअर मार्केटमधील चांगले स्टॉक्स कसे निवडायचे, त्यासाठी काय निकष ठेवायचे, कुठल्या स्टॉक्समध्ये कधी, किती व कशी गुंतवणूक करता येऊ शकते तसेच कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करावी, कुठल्या प्रकारच्या गुंतवणुका टाळाव्यात हे समजायला लागले. सोबतच विमा पॉलिसी कुठल्या काढाव्यात व कुठल्या टाळाव्यात तसेच आपली गुंतवणूक एजंटच्या सल्ल्यानुसार न करता स्वत: का करावे हे कळले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गुंतवणूक चालू केली होती. आज त्या गुंतवणुकीवर ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तीही अवघ्या ६ महिन्यांत. एवढे रिटर्न मिळाले आहेत व इतर कुठल्याही गुंतवणुकीत मिळत नाहीत. आज स्वत:चे पोर्टफोलिओ मॅनेज तर करतोच आहे; पण इतरांनाही त्याविषयी सल्ला देतो आहे. पोर्टफोलिओ मॅनेज करायचा मदत करतो आहे. बॉर्न टू विन अंतर्गत इतरांना शिकविण्याचा प्रयत्न करतो आहे.

चित्रकला : अगदी शाळेत व कॉलेज जीवनापासून चित्रकलेची आवड. खासगी प्रॅक्टिसमध्ये पडण्याअगोदर आठवड्यातून एक तरी चित्र काढायचोच; पण प्रॅक्टिसमध्ये पडल्यानंतर मात्र हा छंद कुठेतरी मागे पडत चालला होता. प्रॅक्टिसमध्ये जाणारा वेळ व प्रॅक्टिस वाढविताना होणारी धावपळ व ओढाताण यांमुळे क्वचितच चित्र काढायचो. वर्षभरात जेमतेम चार-पाच पेंटिंग व्हायची. लॉकडाऊनमध्ये मात्र परत त्याकडे वळता आले. मिलिंद मुळीक, कुलकर्णी, फर्नांडिस अशा चित्रकारांची पुस्तकेही परत वाचली व रोज जवळपास तीन-चार तास चित्रकलेच्या सरावासाठी व चित्र काढायला लागलो. अनेक छान चित्रे काढून झाली. माझी पाच वर्षांची छोटी मुलगीही माझ्यासोबत आवडीने चित्र काढायला बसायला लागली. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर मग काही वेळा बाहेर जाऊनही आम्ही चित्रे काढण्याचा प्रयत्न केला. यातूनच प्रेरणा घेऊन लॉकडाऊनदरम्यान मानसिक आजाराबाबत जनजागृतीसाठी ऑनलाईन चित्रकला स्पर्धा घेतली.

आज मागे वळून पाहिल्यास लॉकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी खूप काही कमवले असे वाटते. टी. व्ही., नेटफ्लिक्स, झोपून राहणे अशा गोष्टींऐवजी जे केले त्यात खूप आनंद मिळाला, शिकायला मिळाले असे वाटते. परत एकदा स्वत:ला भेटून आल्यासारखे वाटले. मुलेही आपल्या पावलावर पावले टाकतात, आपले अनुकरण करतात; त्यामुळे मुलीनेही टी.व्ही. वगैरे जास्त न पाहता पेंटिंग, व्यायाम, मॅजिक पॉट यासारख्या पुस्तकांतून गोष्टी ऐकणे अशा गोष्टीत लॉकडाऊन पार पडला.

प्रत्येकाने आयुष्यभर विद्यार्थी राहायला पाहिजे व नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे या मताचा मी आहे; परंतु लॉकडाऊनच्या निमित्ताने पुन्हा एकदा पूर्णवेळ विद्यार्थी होण्याचा, अभ्यास करण्याचा शिकण्याचा योग आला. परंतु यावेळी कसलीही परीक्षा नव्हती की मार्क मिळविण्याचे टेन्शन. त्यामुळे मिळाला तो फक्त निखळ आनंद आणि शिकवण.

- डॉ. अतुल ढगे

मेंदू व मनोविकार तज्ज्ञ; लैंगिक समस्या व व्यसनमुक्ती तज्ज्ञ