रत्नागिरी : शहरालतच्या एमआयडीसी भागात दोन किलो गांजा पकडल्यानंतर आता पोलीस अधिक सतर्क झाले असून, गांजाचा एकूणच व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. गांजा, नशा येणाऱ्या गोळ्या व सिरप बाळगल्या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी राहीद मुकरी (उद्यमनगर) याला अटक केली आहे तर यातील आणखी एक आरोपी अबू (मुंबई) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गेल्याच आठवड्यात रत्नागिरीच्या एमआयडीसी भागात दोन किलो गांजा जप्त करून एकाला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. या तपासातच पोलिसांना उद्यमनगर येथील राहिद मुकरी याच्याबाबत माहिती मिळाली. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.गुरूवारी तो रत्नागिरीतील शिवखोल घाटी मेस्त्री हायस्कूलजवळ आपल्या हिरो मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्याला हटकले. त्याच्याकडे अमली पदार्थ गांजा व नशा येणाऱ्या गोळ्या व सिरप आढळून आले. हे पदार्थ त्याने मुंबई गोवंडी येथून अबू याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून २६ हजाराचा माल जप्त केला असून, या प्रकरणात राहीद याला अटक करण्यात आली आहे.
गांजा व नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 7:58 PM
रत्नागिरी शहरालतच्या एमआयडीसी भागात दोन किलो गांजा पकडल्यानंतर आता पोलीस अधिक सतर्क झाले असून, गांजाचा एकूणच व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
ठळक मुद्देगांजा व नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी एकाला अटक पोलिसांनी जप्त केला २६ हजाराचा माल