रत्नागिरी : स्थानिक विकास निधीतून कोरोनावरील उपचार सुविधा वाढविण्यात येणार असून यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतील १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शु्क्रवारी एका बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती कक्षात शुक्रवारी झालेल्या या बैठकीसाठी खा. विनायक राऊत, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते. या निधीतून रत्नागिरी आणि राजापूर येथील सरकारी रुग्णालयांचे कामकाज अधिक उत्तम व्हावे यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, रुग्णालयातील खांटाची संख्या वाढविण्यासह फ्रीज व इतर वस्तूंची उपलब्धता होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून खासगी सहकार्यातून कोकणातील ३ जिल्ह्यांसाठी १०० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स प्राप्त झाले. त्यापैकी ५० रत्नागिरी जिल्ह्यासाठी मिळाले आहेत. यातून रत्नागिरी जिल्ह्यातील ५ मतदारसंघातील प्रत्येक मतदारसंघासाठी प्रत्येकी १० आहेत. यातील १० ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स आणि रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५० वायल्स सामंत यांच्या हस्ते यावेळी प्रदान करण्यात आल्या.
जिल्हा माहिती कार्यालय अद्ययावत
जिल्हा विकास निधीअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयासाठी अद्ययावत डिजिटल व्हिडिओ कॅमेरा आणि एक डिजिटल स्टील कॅमेरा खरेदी करण्यात आला आहे. हा कॅमेरा यावेळी खा. विनायक राऊत यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या बातमीला ७ रोजीच्या डीआयओ फोल्डरला फोटो आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.