शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

दोन ट्रकच्या अपघातात एकजण ठार, पाच जखमी

By मनोज मुळ्ये | Published: July 12, 2023 9:26 PM

ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून पडले होते.

देवरुख : दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाचजण जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर करंजारी येथे वळणावर घडली. या धडकेमुळे एका चालकाचा पाय केबिनमध्येच अडकला होता.देवरुख पोलिस स्थानकामधून मिळालेल्या माहितीनुसार, एक ट्रक (एमएच १२ केपी ७९६३) कोल्हापूरहून जयगडकडे जात होता. त्यावर रामभाजू यादव (३८, रा. हवेली पुणे, मूळ रा. उत्तरप्रदेश) हे चालक होते. याचवेळी समोरुन येणाऱ्या ट्रकशी (एमएच ४२ बी ८९६१) त्याची जोरदार धडक झाली. सुनील गंगाराम फोंडे (३० रा. साखरपा, ता. संगमेश्वर) या ट्रकमधून लाकडे घेऊन साखरप्याकडे जात होते.

ही धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही चालक केबिनमध्ये अडकून पडले होते. ग्रामस्थ व पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढले. चालक रामभजू यादव गंभीर जखमी होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दुसऱ्या गाडीचे चालक सुनील गंगाराम फोंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्या ट्रकमधील गणेश रामचंद्र बोडेकर (३३), राजेश गंगाराम रावण (३३), योगेश कृष्णा यादव (२९), सूरज सुरेश करवजे (२९, सर्व राहणार चाफवली ता. संगमेश्वर) हेही या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या तसेच शासनाच्या रुग्णवाहिकेमधून पाली येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती कळताच देवरुख पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप पोवार, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम पाटील, देवरुखचे हेडकॉन्स्टेबल सागर मुरुडकर, साखरपा दूरक्षेत्राचे नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन रात्री उशिरा पंचनामा केला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघात