शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

आवाशी येथील अपघातात एकजण ठार, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:16 PM

मुंबई-गोवा महामार्गावर आवाशी बस थांब्यावर बोलेरो पिकअप गाडीवरील चालकाचा ताबा सुटून तो ट्रकवर जाऊन आदळल्याने रविवारी सकाळी सव्वासहा वाजता घडलेल्या अपघातात एकजण ठार झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी तीनजण गंभीर आहेत.

ठळक मुद्देआवाशी येथील अपघातात एकजण ठार, सहा जखमीझोप अनावर झाल्याने अपघात

आवाशी : मुंबई-गोवा महामार्गावर आवाशी बस थांब्यावर बोलेरो पिकअप गाडीवरील चालकाचा ताबा सुटून तो ट्रकवर जाऊन आदळल्याने रविवारी सकाळी सव्वासहा वाजता घडलेल्या अपघातात एकजण ठार झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. यापैकी तीनजण गंभीर आहेत.नवी मुंबई येथून देवगड, सिंधुदुर्ग येथे जाणाऱ्या बोलेरो पिकअप (एमएच०९/सीयू-५४२०)मधून संजय रघुनाथ कांबळे (५८), स्मिता संजय कांबळे (५०), सुचिता संजय कांबळे (२८), आर्यन संदेश कांबळे (०६), स्वप्निल कांबळे, दीपक जाधव व चालक मोहम्मद शहजाद (२७) प्रवास करीत होते. सकाळी सव्वासहा च्या दरम्यान चालकास झोप अनावर झाल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला व समोरुन येणाऱ्या ट्रक (जीटी ०३/एएक्स५५९२)वर तो विरुध्द दिशेला जाऊन धडकला. हा ट्रक गोवा ते रोजकोट असा चालला होता.ट्रक चालक बलदेवसिंग संतोष सिंग हा चिपळूण येथे विश्रांती घेऊन राजकोटच्या दिशेने चालला होता. या अपघातात संजय रघुनाथ कांबळे हे जागीच ठार झाले तर त्याचे उर्वरित कुटुंबिय जखमी झाले असून त्यांच्यावर खेड येथील उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे उपचार सुरू आहेत.

यापैकी बोलेरो चालक मोहम्मद शहजाद, स्वप्निल कांबळे व दीपक जाधव हे गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर चिपळूण येथील एसएमएस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी