शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
3
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
4
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
5
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
6
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
7
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
8
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
9
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
10
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
11
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
12
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
13
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
14
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
15
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
16
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
17
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
18
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
19
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
20
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं

Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एक ठार, तीन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 7:21 PM

चालकाला झाेप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाडीला धडक दिली. या धडकेत आराम बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले.

खेड : चालकाला झाेप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाडीला धडक दिली. या धडकेत आराम बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले. ही घटना मुंबई- गोवा महामार्गावर मंगळवारी (दि. ३) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमाराला खेड तालुक्यातील उधळे गावानजीक भारत पेट्रोल पंपासमोर घडली. रोशन हरी सरफरे (२८, रा. भू, ता. राजापूर) असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.या अपघातात महेश राजाराम पेंढारकर, (४२, रा. नांदगाव ता. चिपळूण), अक्षता अनंत मांडवकर (२४, रा. नालासोपारा, ठाणे), सरस्वती गंगाराम घाडी, (७०, रा. उभावाडा, लांजा) हे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सिद्धेश सदानंद शेट्ये (३४, रा. वाकेड, ता. लांजा) हा आपल्या ताब्यातील आरामबस (एमएच ०४, जेके ९७७२) घेऊन विरार ते लांजा असा येत हाेता.महामार्गावर उधळे गावानजीक ताे आली असता चालकाला झोप लागली आणि वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे आराम बस पेट्रोलपंपासमोर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप (एमएच ०८, एपी ३२८१) गाडीला धडकली. या धडकेबराेबर महिंद्रा पिकअप समाेरच उभ्या असणाऱ्या रेडीमिक्स सिमेंट टँकर (एमएच ०४, जेके २७५३)वर आदळला तर टँकर इनोव्हा (एमएच ०६, एएन ८४४२) ला पाठीमागून धडकला.हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात टँकरच्या मागे उभी असलेली महिंद्रा पिकअप व आराम बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला होता. या अपघातात चालकाच्या केबिनमध्ये बसून प्रवास करणारा रोशन हरी सरफरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तत्काळ नजीकच्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रोशन सरफरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. या अपघाताची नाेंद खेड पाेलीस स्थानकात करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातhighwayमहामार्ग