चिपळूण, दि. 03 - मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील असुर्डेगावाजवळ लांजा-बोरीवली एसटीची थांबलेल्या इनोव्हा कारला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, असुर्डे येथे इनोव्हा कार रोडच्या बाजूला थांबलेली होती. त्यावेळी लांज्यातून बोरीवलीच्या दिशेने चाकरमन्याना घेऊन जाणा-या एसटीच्या चालकाचा नियंत्रण सुटल्याने एसटीची जोरदार धडक कारला बसली. या कारमध्ये वळंजू कुटूंब होते. ते मुंबईला जात असताना ही घटना घडली. दरम्यान, या अघातात संजय वळंजू जागीच ठार झाले, तर संदीप वळंजू,स्वाती वळंजू,गायत्री वळंजू, शरविली वळंजू हे चारही जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सावर्डे येथील डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघात झल्यानंतर एसटी चालकाने तेथून पलायन केले. मात्र हा अपघात झाल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच, महामार्गावर दोन्ही बाजूला तब्बल 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
मुंबई-गोवा महामार्गावर एसटीची कारला धडक, एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 1:42 AM