२. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दररोज ७,००० चाचण्या करण्यात येतील, असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र, सामंत यांनी जाहीर केल्याप्रमाणे ज्या प्रमाणात कोरोना चाचण्या करणे आवश्यक आहेत, तेवढ्या होत नाहीत. जिल्ह्यात ३,५०० ते ४,००० चाचण्या करण्यात येत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी आरोग्य यंत्रणा राबवावी लागणार आहे. बाधितांच्या तुलनेत आतापर्यंत साडेआठ लाख चाचण्या होणे अपेक्षित हाेते. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने नियोजन तोकडे पडत आहे.
३. जिल्ह्यातील १०८ वर्षांच्या वृद्धा धैर्याने कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाल्या आहेत. त्यांचे नाव सावित्रीबाई तुकाराम निर्मळ (मुसाड, खेड) असे आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, त्यांना खेड तालुक्यातील कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६ मे ते ८ जूनपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, ८ जूनला सायंकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पहिले २ दिवस त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. सध्या त्यांची प्रकृती उत्तम, ठणठणीत असून, त्या घरी सुखरूप आहेत.