रत्नागिरी : मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे.नागरिकांनी मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdimumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्यावी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३५२)२२६२४८ /२२२२३३ किंवा टोल फ्री १०७७ या क्रमांकावर संपर्क साधून खात्री करुन घ्यावी, असेही आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी येथे साधावा संपर्कजिल्हा नियंत्रण कक्ष - ०२३५२- २२६२४८/२२२२३३पोलीस नियंत्रण कक्ष- ०२३५२-२२२२२२राजापूर तहसील कार्यालय - ०२३५३-२२२०२७लांजा तहसील कार्यालय - ०२३५१- २९५०२४रत्नागिरी तहसील कार्यालय - ०२३५२-२२३१२७संगमेश्वर तहसील कार्यालय - ०२३५२-२६००२४चिपळूण तहसील कार्यालय - ०२३५५ - २९५००४गुहागर तहसील कार्यालय - ०२३५९ - २४०२३७खेड तहसील कार्यालय - ०२३५६ - २६३०३१दापोली तहसील कार्यालय - ०२३५८- २८२०३६मंडणगड तहसील कार्यालय ०२३५०-२२५२३६