शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:22 AM

रत्नागिरी : केंद्रीय सिव्हिल सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारांतील ‘अखिल भारतीय नागरी ...

रत्नागिरी : केंद्रीय सिव्हिल सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारांतील ‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होता येणार आहे.

केंद्रीय सिव्हिल सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने विविध खेळ प्रकारांतील ‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’ दरवर्षी आयोजित केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळ्या राज्य शासनाच्या वतीने त्या त्या राज्यांमध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धांसाठी विविध खेळ प्रकारांतील महाराष्ट्र शासनाचा संघ, निवड चाचणी घेऊन स्पर्धांसाठी पाठविला जातो.

राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धांसाठी महाराष्ट्र शासनाचा विविध खेळ प्रकारांतील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे आपल्या विभागात, कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या कार्यालय, विभागामध्ये कार्यरत असलेले खेळाडू, नियमित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्गिं, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत, आदी खेळ प्रकारांत अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धांतून ज्या खेळाडू, कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज (प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे) भरून ते कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने एक आगावू प्रतीसह पाठवावे, असे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

हे अर्ज व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, मुंबई ४०० ०३२ यांच्याकडे ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत टपालाद्वारे व्यक्तीश: तसेच ई-मेलद्वारे (sachivalayagym@rediffmail.com) पाठवावेत, असे आवाहन मानद महासचिव, सचिवालय जिमखाना यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.