शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

..नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील; भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना लगावला टोला

By अरुण आडिवरेकर | Published: November 26, 2024 3:40 PM

रत्नागिरी : ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल, हे ज्यादिवशी शरद पवार यांनी जाहीर केले त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा ...

रत्नागिरी : ज्यांची संख्या जास्त त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद जाईल, हे ज्यादिवशी शरद पवार यांनी जाहीर केले त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा रनिंग रेट खाली कोसळत गेला. हिंदुत्वाची कास सोडून उद्धव ठाकरे ज्या विचित्र दुष्टचक्रात अडकले होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जेवढ कमावल होत तेवढ उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं आहे, अगदी लुगडच गमावल आहे, असा टोला भाजपचे निवडणूक समन्वयक आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी लगावला. जनतेने भरभरुन दिलेले ६० सांभाळता आले नाहीत, त्यांच्या पदरी शेवटी २० आले. आता ते २० सांभाळून ठेवा नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील असा टोला लगावला. भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीसाठी ते मंगळवारी रत्नागिरीत आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदावरुन महायुतीत कोणताही वाद नाही. तीन पक्ष असले तरी त्यांचे न्यायाधीश दिल्लीत बसतात. महाविकास आघाडीच न्यायालय हे जजलेस होतं, महायुतीचे न्यायाधीश योग्य प्रकारे जजमेंट करतील आणि महाराष्ट्राला मुख्यमंत्री देतील, असे जठार म्हणाले.घराबाहेर पडा, लोकांची कामे कराज्यांना जनतेने भरभरुन दिलेले ६० सांभाळता आले नाहीत, त्यांच्या पदरी शेवटी २० आले. आता ते २० सांभाळून ठेवा नाहीतर शून्य जाऊन दोनच शिल्लक राहतील. घराबाहेर पडा, लाेकांची कामे करा, थोडे पैसे खर्च करा, असा टोलाही लगावला. उद्धव ठाकरे यांना आता जर विरोधी पक्ष नेते करायचा असेल, तर उरला सुरलेला पक्ष त्यांनी शरद पवार किंवा काँग्रेसमध्ये विलीन करावा. पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं, असे जठार म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ratnagiriरत्नागिरीPramod Jatharप्रमोद जठारUddhav Thackerayउद्धव ठाकरेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024