शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

..अन्यथा कोकणसाठी महाराष्ट्र उठवू!, राष्ट्रीय महामार्ग विभागाला मनसे नेत्यांचा इशारा

By संदीप बांद्रे | Published: October 19, 2023 7:01 PM

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी गंभीर नाहीत. अधिकारी व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळेच बहादूर शेख नाका येथील उड्डाण पुलाची दुर्घटना घडली आहे. यापुढे कारभारात सुधारणा  न झाल्यास मनसेकडून कोकणासाठी अवघा महाराष्ट्र उठवू, असा इशारा मनसे नेत्यांनी गुरुवारी येथे दिला. याचवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दोन दिवसात मुंबईत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले.मनसे नेत्यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर धडक दिली असता तेथे अधिकारी उपस्थित नसल्याने ठिय्या मांडला. त्यानंतर सायंकाळी कार्यककारी अभियंत्यासमवेत मनसे नेत्यांची बैठक झाली. यावेळी माजी आमदार बाळा नांदगावर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, वैभव खेडेकर, संतोष नलावडे म्हणाले की, गेल्या १७-१८  वर्ष मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम पूर्ण होत नसल्याने इतिहासात त्याची नोंद झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्ते, पूल इतके किलोमीटरचे बांधले असे नेहमी सांगतात. यशाचे श्रेय तुम्ही श्रेय घेता, तर मात्र अपयश कोणी घेयचं? हे तुमचंच अपयश आहे. मुंबई- गोवा महामार्गाला गडकरीचं नाव द्यावं, अशी आमची मागणी आहे. कोट्यवधी रुपयांचा पूल कोसळतो, ही मोठी दुर्घटना आहे. सरकारी अधिकारी, ठेकेदार कंपनी काय करत होती. या प्रकरणात नेमके दोषी कोण यावर कोणीही बोलायला तयार नाही.  नेते मंडळीची उत्तरे नरोबा- कुंजोबा अशी आहेत. वाशिष्ठी नदीवरील पुलावर लोखंडी सळयाबाबतचा मुद्दा उपस्थित करीत या लोखंडी सळ्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार? असा प्रश्न उपस्थित केला. यापुढील काळात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामात सुधारणा न झाल्यास मन सैनिक शांत गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. यावर कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव म्हणाले, सुरळीत वाहतूकीसाठी दोन दिवसात सर्व्हिस रोडच्या रूंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. वाशिष्ठी पुलावरील कॉंक्रीटीकरणाची दुरूस्ती देखील तातडीने केली जाईल. मात्र जोवर केंद्रीय समितीची पाहणी होत नाही, तोवर उड्डाणपुलाच्या कामास सुरवात करता येणार नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणMNSमनसे