शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

आपचे हिंदुत्व म्हणजे हृदयात राम, हाताला काम - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:50 AM

ही लढाई फक्त राज्य वाचवण्याची

दापोली : आपले हिंदुत्व स्पष्ट आहे. आपल्या हिंदुत्वात हृदयात राम व हाताला काम आहे. मात्र, विरोधकांचे हिंदुत्व इतरांचे घर जाळणारे असल्याचा आरोप उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दापोली येथे केला.येथील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले , उद्धव ठाकरे यांनी पद गेल्याचे दुःख केले नाही. मात्र, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला गेल्यावर त्यांना अतोनात दुःख झाले. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून साडेसहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आघाडी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात स्थिरता होती, असे येथील उद्योगपतींचे मत आहे. सध्या राज्यात रोजगार निर्मिती बंद झाली आहे. आहेत ते उद्योग व रोजगार गुजरातला पळवले जात आहेत.येथील तरुणांच्या कपाळावर जात धर्म लिहिलेला नाही. तरुणांना काम हवे असते. आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर त्यावर प्राधान्याने काम करेल, असेही ते म्हणाले आणि त्यांनी आघाडी सरकार आल्यास कोणत्या योजना राबवल्या जातील, हेही सांगितले.यावेळी आमदार भास्कर जाधव, उमेदवार संजय कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. चंद्रकांत मोकल, सचिन कदम, अमोल कीर्तिकर, सदानंद कदम, सायली कदम, माधव शेटे, मुजीब रूमाणे, खालीद रखांगे, विक्रांत जाधव, ऋषिकेश गुजर, शंकर कांगणे, सचिन तोडणकर, भाऊ मोहिते, डॉ. उमेश पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नेते उपस्थित होते.

ही लढाई फक्त राज्य वाचवण्याचीही लढाई आमदार होण्यासाठी नाही तर राज्य वाचवण्यासाठी आहे. योगी आदित्यनाथ व अमित शाह हे बाहेरून येऊन गुजरात व यूपीचे मॉडेल दाखवतात. मात्र, कोविडच्या काळात गंगेमध्ये वाहिली तशी महाराष्ट्रात प्रेते वाहिली नाहीत व गुजरातमध्ये ज्याप्रमाणे ऑक्सिजनला रांगा लावाव्या लागल्या तशा महाराष्ट्रात लावाव्या लागल्या नाहीत. कारण येथे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्र धर्माला जागून जात-पात न पाहता सर्वांचे जीव वाचवले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४dapoli-acदापोलीAditya Thackreyआदित्य ठाकरेHindutvaहिंदुत्वthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024