मंडणगड : तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती लागल्याचे कळताच प्रशासन खडबडून जागे झाले. ज्या ठिकाणी गळती लागले त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी जपून धरणातून बाहेर येत आहे. त्याच वेळी खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे.गळती लागल्याचे कळताच धरण परिसरात मंडणगड तहसीलदार आणि पोलीस दाखल झाले आहेत. त्यांनी नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, असे असलं तरी नागरिक स्थलांतरास किती प्रतिसाद देतात याचा अंदाज सध्या प्रशासन घेणे सुरू आहे.या धरणाशेजारी पंधरा गावे असून धरणाच्या पायथ्याशी जवळपास सहा वड्या असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. प्रशासन गळतीचे प्रमाण पाहून पुढील निर्णय घेईल मात्र असे असले तरी खबरदारी म्हणून येथील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात येते आहे.
पंदेरी धरणाला गळती, नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2021 10:59 AM
Dam Ratnagiri : मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाला गळती लागल्याचे कळताच प्रशासन खडबडून जागे झाले. ज्या ठिकाणी गळती लागले त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी जपून धरणातून बाहेर येत आहे. त्याच वेळी खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे.
ठळक मुद्देपंदेरी धरणाला गळती, प्रशासनाची धावपळखबरदारी म्हणून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू