शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवासासाठी बंद, 'या' मार्गे वळवली वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 7:32 PM

रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार

चिपळूण : मुंबई- गोवा महामार्गावरील परशुराम घाट आता सतत धोक्याची घंटा देऊ लागला आहे. शनिवारी (दि.२) रात्री दरड  कोसळल्याने घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता पुन्हा आज, सोमवारी पावसाचा जोर वाढताच दरडीची माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी ४.३० वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते चिरणी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.मुंबई-गोवा महामार्गावर प्रमुख घाट असलेला चिपळूण येथील परशुराम घाट गेले काही वर्ष धोकादायक ठरू लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार सातत्याने घडत राहिले आहे. आता तर चौपदरीकणासाठी येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई करण्यात आली आहे. त्यामुळे दरडीचा धोका अधिक वाढला असून दरडीची माती दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सलग सुरू झाले आहेत.शनिवारी रात्री घाटातील दरडीची माती व दगड मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. रस्त्यावरून माती बाजूला केल्यानंतर पहाटे पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली होती. वाहतूक सुरू होऊन २४ तास उलटत नाही तोच आज, सोमवारी पावसाचे धुमशान सुरू असतानाच घाटात दरडीची माती खाली येण्यास सुरुवात झाली होती.दरडीची माती हळूहळू खाली घसरत असल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, महामार्ग विभागाचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधीनी तात्काळ परशुराम घाटात धाव घेऊन पाहणी केली व सायंकाळी ४.३० वाजलेपासून घाटातील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. अन् या मार्गावरील वाहतूक कलंबस्ते चिरणी मार्गे वळवण्यात आली.सर्व यंत्रणा सज्जरात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी घाट परिसरात ठाण मांडून राहिले आहेत. तसेच सर्व यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी