शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी पासपोर्टची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:22 PM

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी प्रथमच सुरू होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र्र, पुढील काही महिन्यांत सुरू होणारी विमानसेवा अशा विविध सुविधांमुळे येथील कोकणच्या विकासाला ...

राजापूर : येथील पोस्ट कार्यालयात रविवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांच्या हस्ते झाले. राजापूर पंचायत समितीच्या किसान भवनात हा कार्यक्रम पार पडला.कोकणातील दोन जिल्ह्यांसाठी प्रथमच सुरू होत असलेले पासपोर्ट सेवा केंद्र्र, पुढील काही महिन्यांत सुरू होणारी विमानसेवा अशा विविध सुविधांमुळे येथील कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केले.अलीकडच्या काळात कोकणचा विकास झपाट्याने होत आहे. रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येथील विमानतळ सज्ज झाले असून, लवकरच तेथून विमान उड्डाण घेतील. कोकण रेल्वे मार्गावर सुधारणा होत आहेत. महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे.त्यानंतर आता कोकणात प्रथमच दोन जिल्ह्यांसाठी राजापूरमधील पोस्ट कार्यालयात टपाल पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होत असून, या सर्वांचे श्रेय हे खासदार विनायक राऊत यांना असल्याची भावना वायकर यांनी व्यक्त केली. त्यावेळी खासदार राऊत यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. राजापूर पंचायत समितीला नवीन सभागृह देणार असून, त्यासाठी ५० लाखांचा निधी देणार असल्याची पालकमंत्र्यांनी घोषणा केली.दोन जिल्ह्यातील विमानतळांवरून विमानसेवादेखील लवकरच सुरु होणार आहेत. त्यामुळे भविष्यात कोकणचा विकास जलदगतीने होणार असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. कोकणात पासपोर्ट सेवा केंद्र्र व्हावे, अशी मागील ३५ वर्षे मागणी होती पण ती काही केंद्र्र सरकारला पूर्ण करता आली नव्हती. मात्र ते शिवधनुष्य खासदार विनायक राऊत यांनी यशस्वीपणे पेलवले. साधारणपणे कोणत्याही विकासकामाला अधिकारीवर्गाची साथ नसेल, तर कामे खोळंबतात पण पासपोर्ट सेवा केंद्रासाठी संबंधित अधिकाºयांनी चांगले सहकार्य केले, याचा त्यांनी उल्लेख केला.सेवेमुळे परदेशगमनाला जाणाºया सर्वांना आता पासपोर्टसाठी कुठेच जाण्याची गरज नाही. आता राजापुरातच ती सेवा सुरु झाली आहे. याबद्दल आमदार राजन साळवी यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित असणाºया पासपोर्ट विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी पासपोर्ट सेवेबाबत उपस्थितांना माहिती दिली. त्यानुसार देशात सध्या ३६ पासपोर्ट कार्यालये असून, ९२ सेवाकेंद्रे व २१५ पीओपीएससी सेवा सुरु असल्याची माहिती दिली. देशात वर्षाला सात ते आठ लाख नवीन पासपोर्ट काढले जातात, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, स्थानिक आमदार राजन साळवी, आमदार उदय सामंत, विधानपरिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानु खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, राजापूरचे नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, सभापती अभिजित तेली, मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट सेवेच्या अधिकारी स्वाती कुलकर्णी, पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्राचे डॉ. एन. विनोदकुमार, माजी आमदार गणपत कदम, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, महिला आघाडीच्या शिल्पा सुर्वे, तहसीलदार प्रतिभा वराळे, उपसभापती प्रशांत गावकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिलकुमार करगुटकर यासह पोस्ट कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बीएसएनएल अधिकाºयांशी चर्चा करणारसर्व प्रयत्न सुरू असताना संबंधित अधिकाºयांनीदेखील चांगले सहकार्य केल्यामुळे कोणतीच अडचण आली नाही. कोकणात प्रथमच पासपोर्ट सेवा केंद्र्र सुरु झाले असून त्यांना ‘कनेक्टिव्हीटी’ची अडचण येऊ नये म्हणून मुंबईतील ‘बीएसएनएल’च्या अधिकाºयांशी आपण चर्चा करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.