खेड : येथील रेल्वेस्थानक परिसरात फलाट क्रमांक १ वरून प्रवाशांना थेट मुंबई-गोवा महामार्गावर बाहेर पडता येईल, अशी एक पायवाट होती. तिचा वापर रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणारे करीत होते. मात्र, रेल्वे यंत्रणेने या पायवाटेवर आता कुंपण घातल्याने मार्ग बंद झाला आहे.
मुंडे महाविद्यालयात विविध कार्यक्रम
मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा याेजना विभागामार्फत कोविड-१९ सामाजिक अंतर ठेवून ऑफलाइन व ऑनलाइन पध्दतीने नुकतेच विविध कार्यक्रम पार पडले.
कामगार आयुक्तांकडून दखल
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील चौगुले लावगण डाकयार्डमधील भूमिपुत्र कामगारांवरील अन्यायाच्या तक्रारीची दखल सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाने घेतली आहे. कामगारांवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात मनसेच्या नेत्यांनी तक्रार केली होती.
जवान परतले मुख्यालयी
चिपळूण : गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर चाकरमान्यांची गर्दी झाली होती. वाढत्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रेल्वे स्थानकात विशेष कृती दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. आता ते आपल्या मुख्यालयात परतले आहेत.