राजापूर : राजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे तसेच विलास पेडणेकर, जितेंद्र खामकर यांनी सामाजिक बांधिलकीतून रायपाटण कोविड सेंटर येथे भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रुग्णांना धीरही दिला.
कोरोनाबाधित रुग्णांना रायपाटण येथील खापणे महाविद्यालयाच्या मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहात केलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवण्यात येत आहे. १०० रुग्णांची क्षमता असलेल्या या कोविड सेंटरमध्ये गुरुवारपर्यंत ६४ रुग्ण दाखल होते. घरापासून कुटुंबीयांपासून दूर राहणाऱ्या या रुग्णांना मानसिक आधार मिळावा या हेतूने राजापुरातील काही नागरिकांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. रायपाटण कोविड सेंटरमधील रुग्णांना १५ ते २० दिवस पुरतील एवढे बिस्किटपुडे नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, विलास पेडणेकर, जितेंद्र खामकर यांच्याकडून देण्यात आले. यावेळी कोविड सेंटरमधील डाॅक्टर, गनी खोपेकर यांच्यासह कोविड सेंटरमधील कर्मचारी उपस्थित होते.
............................
रायपाटण येथील काेविड सेंटरमधील रुग्णांना नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे तसेच विलास पेडणेकर, जितेंद्र खामकर यांच्याकडून खाऊचे वाटप करण्यात आले.