शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

व्यवसायासाठी ‘पेशन्स’ महत्त्वाचे

By admin | Published: May 24, 2016 9:57 PM

योगेश देवधर : दुग्धोत्पादन वाढीसाठी समाज आणि शासनही उदासीन

कोकणात दुग्धोत्पादन व्यवसाय पारंपरिक असला तरी अनेक मूलभूत समस्यांनी या व्यवसायाला ग्रासले. त्यामुळे गावांमधील बहुतांश दूध डेअऱ्या बंद झाल्या आहेत. अनेक दूध उत्पादक संस्थांना घरघर लागली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही खासगी उत्पादकांनाही नाइलाजाने आपले व्यवसाय बंद करावे लागले. सध्या जिल्ह्याबाहेरील ‘ब्रँडेड’ कंपन्यांच्या दूध पिशव्यांनी जिल्ह्यात चांगलेच बस्तान बसविले आहे. मात्र, अशा परिस्थितीत या मूळ सिंधुदुर्ग येथील पण आता रत्नागिरीनजीकच्या भोके येथे वास्तव्यास असलेले तरूण उद्योजक योगेश देवधर यांनी मार्च २०१६पासून रत्नागिरी आणि परिसरात ‘देवधर डेअरी फार्म’ या ब्रँडखाली दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य उत्पादने यांचे अधिकृत वितरण करण्यास प्रारंभ केला आहे. याविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्न : या क्षेत्रात कसे आलात ?उत्तर : मी मूळचा शेरपे (सिंधुदुर्ग) येथील. घरची शेती वगैरे होती. त्यामुळे या व्यवसायाची आवड होतीच. रत्नागिरीत व्यवसायानिमित्त आलो आणि प्रिंटर दुरूस्ती, टोनर, काट्रेज रिफिलिंग सुरू केले. काही वर्षांनंतर भोके (ता. रत्नागिरी) येथे माझ्या मित्राने जागा विकायला काढली. त्यावेळी त्याने मला विचारले आणि २००५ साली मी ती विकतही घेतली. मात्र, त्यावेळी या व्यवसायाबाबत तसं काही डोक्यात नव्हतंच.प्रश्न : व्यवसायाची सुरूवात कशी केली ?उत्तर : २००८ साली मी या जागेत घर बांधलं आणि मग आपण दुग्धोत्पादन व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. दोन - तीन म्हशी घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. पण, दुधाचे प्रमाण आणि त्यासाठी होणारा खर्च याचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे मग म्हशी घेऊन व्यवसाय वाढविण्याचे ठरवले. २०१३ साली १० म्हशी घेऊन गोठा बांधला आणि मग पहिल्यांदाच जाकादेवी, खंडाळा, निवळी, हातखंबा आदी भागात दूध वितरीत करण्यास सुरुवात केली. हा व्यवसाय करताना लक्षात आले की, जिल्ह्यात बाहेरून ६० ते ६५ हजार लीटर दूध येते. तरीही पिशवीबंद दुधाची मागणी वाढतच आहे. २०१४ साली ३० म्हशींचा गोठा सुरू केला. दररोज दीडशे लीटर दूध मिळू लागले. पॅकिंग मशीन आणून अर्धा लीटरच्या दूध पिशव्यांमधून विक्री सुरू झाली. मात्र, दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी ब्रँडिगची अडचण वाटू लागली. यादृष्टीने आपले ब्रँडिंग असणे गरजेचे वाटू लागले. लोकांची सकस आणि दर्जेदार दुधाची मागणी पूर्ण करण्यासाठी हेही तितकेच आवश्यक होते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. नोव्हेंबर २०१५मध्ये म्हशीच्या दुधासाठी पाश्चराईज्ड आणि गाईच्या दुधासाठी होमोजिनाईज्ड प्रक्रिया करणारे युनिट घेतले. कोटीच्या युनिटसाठी माझ्या बँकेने मला सहकार्य केले. प्रश्न : या समस्यांवर कशी मात केली?उत्तर : मी म्हटलं तसं एखाद्या व्यवसायात पडायचं म्हटलं तर त्या व्यवसायातील बारीकसारीक मुद्दे लक्षात घ्यायला हवेत. अडचणींचा विचार आधी करायला हवा. त्यादृष्टीने महत्त्वाची गरज होती, ती चाऱ्याची. त्यामुळे माझ्या जागेत एक एकरवर चाऱ्याची लागवड केली. पाण्याचेही योग्य नियोजन केले आहे, त्यामुळे चाराही चांगल्या प्रकारे मिळत आहे. या जनावरांच्या शेणातूनही मोठा व्यवसाय उभा राहतो, हे लक्षात घेऊन चार महिन्यांपासून शेणापासून गांडूळ खत प्रकल्प सुरू केलाय. वर्षभरात ८० टनापर्यंत खत यामुळे मिळू शकेल.प्रश्न : रत्नागिरीत या व्यवसायाची व्याप्ती कशी वाढविली ?उत्तर : दोन - तीन वर्षे मी भोके येथे ३०० लीटर दूध वितरीत करत आहे. त्यामुळे याचा सखोल अभ्यास केला होताच. माझ्या प्रिंटर दुरूस्ती व्यवसायाच्या जागेतच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि १ मार्चपासून रत्नागिरीत दूध वितरणास सुरुवात केली. सध्या ५० म्हशी आणि दहा गायी घेतल्या आहेत. सध्या ६०० लीटर दुधाचे दररोज वितरण सुरू आहे. दुधाबरोबरच आता खवा, तूप, लोणी, ताक आदी दुग्धजन्य पदार्थांची विक्रीही सुरू केली आहे. लवकरच श्रीखंड, आम्रखंड आदी पदार्थही सुरू करण्याचा मानस आहे. हळूहळू दूध संकलन वाढविणार असून, दोन - तीन संकलन केंद्रही वाढविणार आहे. चिपळूण, देवरूख, संगमेश्वर या शहरांमध्येही वितरण सुरू करणार आहे. प्रश्न : व्यवसायासाठी शासकीय योजनेचा लाभ घेतला काय ?उत्तर : खरं सांगू, शासकीय योजनांना अर्थ नाही. केवळ पेपर रंगविले जातात, त्याचा उपयोग नाही. ज्याला खऱ्या अर्थाने गरज असते, त्याला त्या योजनेचा लाभ मिळतच नाही. शासनाकडून जी यंत्रसामग्री दिली जाते, तिचा उपयोग खऱ्या अर्थाने किती शेतकऱ्यांना होतो, हा विचार होणे महत्त्वाचे आहे. याचा अनुभव घेतल्यामुळे माझ्या व्यवसायासाठी मी शासकीय योजनेचा एकही पैसा घेतला नाही. प्रश्न : या व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांना काय सांगाल ?उत्तर : खडतर कष्ट करावे लागतात, यामुळे या व्यवसायात नव्याने येण्यासाठी कुणी तयारी दाखवत नाही. मी अनेक बचत गटांना यासाठी सुचविलं होतं. मात्र, व्यवसाय करण्याचीच इच्छा दिसत नाही. त्याचबरोबर शासनही उदासीन आहे. या व्यवसायात लोकांनी यावे, यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, या व्यवसायातील अडचणी दूर करायला हव्यात. पण, तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच आज या पारंपरिक दुग्ध व्यवसायाला कोकणात उतरती कळा लागली आहे.प्रश्न : या व्यवसायात यश मिळण्यासाठी काय करायला हवे ?दुग्धोत्पादन व्यवसायात तुमचं पुस्तकी ज्ञान उपयोगी पडत नाही. येथील भौगोलिक परिस्थितीचाही विचार करणे आवश्यक असते. तुमचं व्यवसायाचं कॅलक्युलेशन चुकतं कुठं, व्यवसाय सुरू केल्यानंतर उत्पादन मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरचा खर्च लक्षात घ्यायला हवा. ओला चारा, सुकं खाद्य यांचा वाहतूक खर्च वाढतो. हा खर्च वाढला की, गणित चुकतं. म्हणूनच यासाठी पेशन्स आवश्यक असतात. सुरुवातीला काही वर्षे आपण नफ्याची अपेक्षा न करता सातत्याने परिश्रम करायला हवे. आपल्या परिश्रमांवर विश्वास हवा. एवढे केले तर काही दिवसांनी यश नक्कीच मिळू शकेल. - शोभना कांबळे