खेड : गेल्या महिनाभरापासून खेड शहरात डेंग्यूसदृश्य तापाने डोके वर काढले असून, महिनाभरात १५ डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७ जण ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.
३० कोटींची योजना प्रगतीपथावर
रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वाधिक मोठ्या गणपतीपुळे, चाफे, देऊड या तीन गावांसाठी होणाऱ्या ३० कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला. ही कामे घेण्यासाठी ८ जण पुढे आले आहेत. त्यामुळे या कामाला लवकरच गती येणार आहे.
सांडपाणी प्रकल्प उभा राहणार
रत्नागिरी : आयआयटी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गणपतीपुळे येथे जिल्ह्यातील पहिलाच बंद सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प साकारला जाणार आहे. त्याच्या कामालाही प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ११ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
खड्डे भरण्यास सुरुवात
लांजा : लांजा शहरातून गेलेल्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या धोकादायक खड्ड्यांकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीने शहरात महामार्गावर वृक्षारोपण केले होते. त्यामुळे प्रशासनाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.
आसूद - मुरुड रस्त्यावर खड्डे
दापोली : तालुक्यातील आसूदकडून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्याला पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील खड्डे ग्रामपंचायतींने काही दिवसांपूर्वी बुजवले होते.