लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राज्याच्या परिवहन विभागाने घरबसल्या ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्याची सुविधा दिली असली तरीही हे पोर्टलच अद्याप सुरू न झाल्याने ऑनलाईन लायसन्स आता या कार्यालयात जावून काढावे लागणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सध्या कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या क्षमतेसह सुरू असल्याने शिकाऊ परवाना काढण्याची प्रक्रिया बंदच आहे. त्यामुळे लर्निंग लायसन्सच नसल्याने वाहन चालवून पोलिसांचा ससेमिरा कसा चुकवायचा, ही चिंता नव्याने शिकलेल्या चालकांना सतावत आहे.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावून लायसन्स काढण्याऐवजी ते ऑनलाईन काढता यावे, यासाठी केंद्र शासनाने घरबसल्या लर्निंग लायसन्ससाठी अर्ज भरून परीक्षाही देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या सर्वच कार्यालये १५ ते २५ टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन पद्धतीने लर्निंग आणि पर्मनन्ट लायसन्सही काढता यावे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी शासनाच्या सारथी प्रणालीचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन वाहनचालकांना कोरोना काळात धोका पत्करून उपप्रादेशिक कार्यालयात जाण्याची गरज नाही. मात्र, सध्या हे पार्टलच बंद असल्याने आरटीओ कार्यालयात जावून परवाने काढावे लागणार आहेत.
ऑनलाईनसाठी अडचणी काय?
ऑनलाईन पद्धतीमध्ये सातत्याने कनेक्टिव्हिटीचा अडसर होत असतो. अनेकदा हे पोर्टल सातत्याने खंडित होत असल्याने वेळेचा अपव्यय होतो.
n ऑनलाईन पद्धतीमध्ये महा ई-सेवा केंद्र किंवा ट्रेनिंग देणाऱ्या संस्थांकडून गैरप्रकार होण्याचा धोका संभवतो.
n ऑनलाईन पद्धतीत अर्ज भरणारी व्यक्ती एक आणि परीक्षा देणारी व्यक्ती दुसरी असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
n ऑफलाईन पद्धतीने ज्यांनी लर्निंग लायसन्स काढली आहेत, त्यांना आता आरटीओ कार्यालयाकडून तारीख घ्यावी लागणार असल्याने सध्या प्रतीक्षाच करावी लागतेय.
उमेदवार वेगळा, ऑनलाईन परीक्षा देणारा दुसराच
ऑनलाईन असलेल्या बहुतांशी परीक्षांमध्ये अनेक अडचणी येत आहेत. लर्निंग लायसन्सच्या बाबतीतही ऑनलाईन काढताना अनेक अडचणी येणार आहेत. उमेदवाराला अर्जही ऑनलाईन भरावा लागणार आहे. त्याचबरोबर परीक्षाही ऑनलाईन द्यावी लागणार आहे. त्यामुळे अर्ज भरणारी व्यक्तीच ऑनलाईन परीक्षा देईल, असे नाही. त्यामुळे सारथी पोर्टलवर यादृष्टीने अधिक काटेकोरपणे नियमांचे पालन होण्याच्या दृष्टीने सुधारणा करणे गरजेचे आहे.
शासनाच्या निर्देशानुसार, ऑनलाईन लायसन्सची प्रक्रिया सुरू आहे. सध्या कोरोनाच्या काळात खबरदारीची उपाययोजना म्हणून लर्निंग लायसन्ससाठी घरबसल्या अर्ज करता येतो. तसेच त्यासाठी परीक्षाही ऑनलाईन देता येते. सध्या कार्यालयात लायसन्स देणे बंद केले आहे. मात्र, महत्त्वाचे कामकाज सुरू आहे. पोर्र्टलही लवकरच सुरू होईल.
- अविनाश मोराडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी
परवाना विभाग बंद
रत्नागिरीतील आरटीओ कार्यालयातील वाहन परवाना विभागाचे काम सध्या काेरोना काळात बंद ठेवण्यात आले आहे. ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी शासनाने नवीन प्रणाली सुरू केली आहे. सध्या ही सुविधा बंद असल्याने नवशिकाऊंची अडचण होत आहे.
कारवाईचा धोका
१८ वर्षे पूर्ण झालेल्या महाविद्यालयीन युवकांना आपण गाडी कधी चालवतो, असे झाले आहे. मात्र, लर्निंग लायसन्स ऑनलाईन काढण्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईची भीती वाटत आहे.
म्हणून आरटीओ कार्यालय गाठले
सध्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका ओळखून केंद्र शासनाने ऑनलाईन लर्निंग लायसन्स काढण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. सध्या आरटीओ कार्यालयातही २५ टक्के कर्मचारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे लायसन्स ऑफलाईन बंद आहेत. मात्र, सध्या पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी लायसन्स मिळणे गरजेचे असल्याने आता आरटीओ कार्यालयात येण्याची वेळ आली आहे.
- श्वेता जंगम, रत्नागिरी
डमी ८७०