शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शाळांना कायमचे कुलूप?

By admin | Published: November 25, 2014 12:21 AM

जिल्हा परिषद : ११३९ विद्यालयांची वाचण्यासाठी धडपड

रहिम दलाल- रत्नागिरी =जिल्हा परिषदेच्या १ ते २० पटाच्या ११३९ प्राथमिक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ अत्यल्प पटसंख्या असलेल्या या शाळांमध्ये चालू वर्षात ६५ शाळांची वाढ झाल्याने शिक्षण विभागाकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये १ लाख ७ हजार ६३८ विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत आहेत़ मात्र, ही पटसंख्या प्रत्येक शैक्षणिक वर्षात घटत चालल्याने शैक्षणिक क्षेत्रात चिंता व्यक्त करण्यात येत आहे़ डोंगराळ, अतिदुर्गम भागातील अत्यल्प पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना आरटीईचा फटका बसणार असल्याने शैक्षणिक क्षेत्रात याबाबत जोरदार चर्चा नेहमीच सुरु असते़ ग्रामीण भागातही खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक शाळांची संख्या वाढत असून, त्याकडे पालकवर्ग आकर्षित होत आहे़ तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते़जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक सोयीसुविधा देण्यात येत असतानाही खासगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओघ चिंतेची स्थिती निर्माण करणारी आहे़ जिल्हा परिषदेच्या ११३९ प्राथमिक शाळांची स्थिती बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामध्ये मराठी १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ४६६, तर ११ ते २० पटसंख्या असलेल्या ६७३ शाळा आहेत़ जिल्हा परिषदेकडून मोफत पाठ्यपुस्तकांसह गणवेश देऊनही संपूर्ण शिक्षण मोफत असताना या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत़ त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात चिंंता व्यक्त करण्यात येत आहे़ येत्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांचीच कमीजिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक वर्षी घट होत चाललेली पटसंख्या ही लोकसंख्या कमी होत असल्याचे कारण शिक्षण विभागाकडून पुढे करण्यात येत आहे़ मात्र, प्रत्यक्षात खासगी शैक्षणिक संस्थांच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांची संख्याही वाढत चालली आहे़ जिल्हा परिषद शाळांमधील प्रत्येक वर्षी घट होत चाललेली पटसंख्या ही लोकसंख्या कमी होत असल्याचे कारण शिक्षण विभागाकडून पुढे करण्यात येत आहे़ मात्र, प्रत्यक्षात खासगी शैक्षणिक संस्थांच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळांची संख्याही वाढत चालली आहे़ चालू शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या गतवर्षीपेक्षा १२००ने घटली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची एकूण स्थिती पाहता यावर्षी इयत्ता पाचवीचे ७१२ आणि इयत्ता आठवीचे ३२४ नवीन वर्ग जोडण्यात आले. इयत्ता पाचवी व आठवीचे नवीन वर्ग जोडले नसते तर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असती.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण असतानाही विद्यार्थीसंख्या वाढत नसल्याने विद्यार्थीवाढीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासनाचा खासगीकरणाकडे कल असल्याने खासगी शाळांना मोठ्या प्रमाणात मंजूरी देण्यात आहे.मागील शैक्षणिक वर्षामध्ये १ ते २० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या १०७४ होती. मात्र, चालू शैक्षणिक वर्षामध्ये ही संख्या कमी होण्याऐवजी त्यामध्ये ६५ शाळांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता ही ११३९ शाळा झाली आहे. पटसंख्या घट होण्याच्या शाळांचा आखेर वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तालुका १ ते १० ११ ते २०पटसंख्या असलेल्या शाळामंडणगड४०३९दापोली५५७९खेड८४९२चिपळूण५३९४गुहागर२८४५संगमेश्वर७२१०५रत्नागिरी३९७१लांजा३३५७राजापूर६२९१एकूण-४६६६७३