पावस : रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे पूर्णगड सागरी पोलीस व ग्रामपंचायत पावस यांच्या संयुक्त विद्यमाने विनाकारण फिरणारे व पावसमधील व्यापारी असे एकूण ११२ जणांची काेराेना चाचणी करण्यात आली़ या चाचणी विनाकारण फिरणारा एकजण पाॅझिटिव्ह आला असून, उर्वरित सर्वांची तपासणी निगेटिव्ह आली आहे़
पावस परिसरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे त्यांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता़ त्याचबराेबर पावस परिसरातील सर्वच व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात आली़ या चाचणीमध्ये विनाकारण फिरणारा एकजण पाॅझिटिव्ह आला आहे़ तर पावस परिसरातील व्यापाऱ्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे़ त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे़
कोरोना चाचणीची कारवाई करण्याकरिता पूर्णगड सागरी पोलीस स्थानक व ग्रामपंचायतीतर्फे ही मोहीम राबविण्यात आली होती़ त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र पावसचे डॉ़ संतोष कांबळे, आरोग्यसेविका आर आर सावंत यांनी सर्वांच्या सहकार्य केले. आरोग्यसेवक अनिल धोपटे, आरोग्यसेविका पावरी सिस्टर यांच्या मदतीने ही मोहीम पूर्ण केली. यावेळी पावस गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. मूरकर, ललीत देवसकर व होमगार्ड उपस्थित हाेते़