दापाेली : विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित, दापोली अर्बन ॉबँक सिनीयर सायन्स कॉलेजतर्फे ‘ग्लिंप्स थ्रू हिज लेन्स - ही ऑनलाइन फोटोग्राफी कार्यशाळा’ घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवन छायाचित्रकार ॲड. किशोर घुमास्ते यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने
या कार्यशाळेमध्ये छायाचित्रकार ॲड. किशोर घुमास्ते यांनी आपल्या फोटोग्राफीचा खजिना सर्वांसाठी खुला करीत विविध फोटो दाखवून निसर्ग, नृत्य, पुरातन मंदिरे इ. स्थळांचे आकर्षक फोटो कसे काढावेत, याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आपला स्वानुभव कथन करीत फोटोग्राफी कशी करावी, कॅमेरा कसा हाताळावा, कॅमेरातील विविध बारकावे; याबाबत उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांनीही सहभाग घेतला हाेता. कॉलेजचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे व महाविद्यालयातील अभ्यासेतर उपक्रम समितीचे समन्वयक प्रा. संतोष मराठे यांचीही यावेळी उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन कॉलेजच्या सांस्कृतिक उपक्रमांच्या संयोजक प्रा. प्रियंका साळवी यांनी केले. कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडावी, यासाठी कॉलेजच्या सांस्कृतिक समितीचे सदस्य प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. विश्वेष जोशी, प्रा. ऋजुता जोशी, प्रा. प्रिया करमरकर, प्रा. श्रुती आवळे यांचे सहकार्य लाभले.