रत्नागिरी : जामनगर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पाण्याची बाटली म्हणून रेल्वे स्थानकावरील नळाचे पाणी भरून देण्यात आले. त्यासाठी एका कंपनीच्या दोन रिकाम्या बाटल्या वापरण्यात आल्या. ही बाटली सीलबंद नव्हती, अशी तक्रार एका प्रवाशाने रत्नागिरीरेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांकडे बुधवारी केली. त्यानंतर काही वेळातच या प्रकरणातील संशयित आरोपीला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्यावर कारवाई केली. यामुळे जामनगर एक्स्प्रेस गाडी सकाळी रत्नागिरी स्थानकात अर्धा तास थांबविण्यात आली होती.कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव रवींद्र व्यास नटवरलाल (रा. कल्याणनगर स्टेशन, राजकोट) असे आहे. याबाबत प्रवाशाने तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी रवींद्र व्यास नटवरलाल याला रेल्वे पोलिसांनी पकडून स्थानकात आणले. यावेळी पोलीस अधिकारी अजित मधाळे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.सीलबंद पाण्याच्या बाटल्या पाणी संपल्यानंतर फेकून दिल्या जातात. बरेचजण या बाटल्या चुरगाळून टाकतात. या बाटल्यांचा पुन्हा वापर केला जाऊ नये, हा उद्देश त्यामागे असतो. मात्र, हिरवे लेबल असलेल्या एका ड्रिंकींग वॉटर कंपनीच्या या दोन रिकाम्या बाटल्या स्थानकावरील साध्या पाण्याने भरून त्या प्रवाशांना विकण्यात आल्याचे तपासात पुढे आले. या प्रकारामुळे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या पाण्याबाबतही आता साशंकता निर्माण होऊ लागली आहे. याकडे वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.
कंपनीच्या बाटलीत साधे पाणी, रेल्वे पोलिसांची रत्नागिरीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 3:42 PM
जामनगर एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पाण्याची बाटली म्हणून रेल्वे स्थानकावरील नळाचे पाणी भरून देण्यात आले. त्यासाठी एका कंपनीच्या दोन रिकाम्या बाटल्या वापरण्यात आल्या. ही बाटली सीलबंद नव्हती, अशी तक्रार एका प्रवाशाने रत्नागिरी रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांकडे बुधवारी केली.
ठळक मुद्देकंपनीच्या बाटलीत साधे पाणीसंशयितावर रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडून कारवाई