असगोली : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा, वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीच्या राेपांची लागवड करण्यात आली.
यावेळी केंद्रप्रमुख अशोक गावणकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अस्मिता नाटेकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, स्मिता जांभरकर, पल्लवी घुले, ऋतुजा रोहिलकर, सुषमा रोहिलकर, सानिया वनकर, विशाखा नाटेकर, विद्या रोहिलकर, संध्या पालशेतकर, वैष्णवी कदम, सुवर्णा कोलथरकर उपस्थित होत्या. ऑक्सिजन देणाऱ्या तुळशीसारख्या बहुगुणी वनस्पतीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालकांनीही आपल्या घरासमोर तुळशीच्या रोपांची लागवड करण्याचा संदेश त्यावेळी देण्यात आला. पाच वर्षांपूर्वी लावलेल्या अशोकाचे बहारदार वृक्षात रूपांतर होत असून, त्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दरवर्षी लावलेल्या वृक्षांचे जतन, संरक्षण व जोपासना करावी, असे मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले.