शहरं
Join us  
Trending Stories
1
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
2
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
3
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
5
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
6
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
7
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
8
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
9
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
10
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
11
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
12
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
13
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
14
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
15
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
16
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
18
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
19
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
20
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं

बुरखाधारी महिलेकडून लूट

By admin | Published: September 12, 2014 11:32 PM

वृध्दा जखमी : पाण्याचा बहाण्याने चोरी करताना हातोड्याने मारहाणही

रत्नागिरी : पाणी मागण्याचा बहाणा करून घरात आलेल्या बुरखाधारी महिलेने ७२ वर्षीय वृध्देच्या डोक्यावर हातोड्याचा प्रहार करीत तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर बेकायदेशीररित्या घरात शिरून घरातील सुमारे ३० हजारांचे सोन्याचे दागिने व ४ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला. हा प्रकार आज (शुक्रवार) सकाळी १०.३० वाजता शहरातील हयातनगर भागात बैतुलफला अपार्टमेंटमध्ये घडला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दुपारनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हयातनगरमधील यास्मीन फकिर महंमद मुल्ला (७२) या बैतुलफला या अपार्टमेंटमधील रुम नंबर ३०२ मध्ये राहतात. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एक बुरखाधारी महिला त्यांच्या फ्लॅटकडे आली. तिने पिण्यास पाणी मागितले. त्यानंतर पैशांची मागणी केली व नंतर वृध्देच्या डोक्यावर हातोडीचा जबर प्रहार केला.घटनास्थळी माहिती घेता यास्मीन या प्रहाराने जखमी झाल्याने खाली कोसळल्या व बेशुध्द झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी घरी अन्य कोणीही नव्हते. यास्मिन यांना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शुध्द आली. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना पाचारण करण्यात आले. पंचनामा करण्यात आला. त्याचवेळी जखमी यास्मीन यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)