ऑनलाइन लोकमतरत्नागिरी, दि. २६ दापोली कोकणातील समुद्राला उधाण आले असून , समुद्राच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून किनारपट्टीवरील गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
दापोली तालुक्यातील मुरुड , कर्दे , लाडघर, तामसतीर्थ या ठिकाणी समुद्राच्या पाणी मानवी वस्ती कडे घुलेय , या पाण्यामुळे किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत , तसेच मुरुड च्या समुद्र किनारा-याची मोठ्या प्रमाणात धूप झाल्याने मानवी वस्तीला धोका निर्माण झालाय , या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
समुद्र किनाऱ्यावरील काही गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत . कोकणात काल पासून दमदार पावसाने सुरुवात केलीय , या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी अंशतः नुकसान झाले आहे . एकंदरीतच या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावलाय.