रत्नागिरी : ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लाेष करताना काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाेलिसांकडून जिल्ह्यात ४६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली हाेती. या नाकाबंदी दरम्यान मद्य प्राशन करुन वाहन चालविण्याची एकही केस दाखल झालेली नसल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.जिल्ह्यात एकूण ४६ ठिकाणी ३१ डिसेंबर राेजी रात्री ११ वाजल्यापासून नाकाबंदी करण्यात आली हाेती. त्यासाठी ३५ पाेलिस अधिकारी, १९३ पाेलिस अंमलदार आणि ७६ गृह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात हाेते. ही नाकाबंदी पहाटेपर्यंत ठेवण्यात आली हाेती. या नाकाबंदीदरम्यान प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत हाेती. या तपासणी दरम्यान जिल्ह्यात काेठेही मद्य प्राशन करुन वाहन चालविल्याचा प्रकार घडलेला नाही. तसेच काेणत्याही प्रकारचा अपघातही झाल्याची नाेंद झालेली नाही.पाेलिसांनी नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली. या तपासणीत १५० वाहन चालकांवर माेटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८३,७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात ‘थर्टी फर्स्ट’ला १५० वाहनचालकांना दणका, वसूल केला 'इतका' दंड
By मनोज मुळ्ये | Published: January 02, 2024 4:40 PM