मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांना पोलिसांनी रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:31 PM2019-09-17T14:31:43+5:302019-09-17T14:39:36+5:30

भाजपची महाजनादेश यात्रा आज सायंकाळी रत्नागिरीत दाखल होत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

Police officers were stopped by the Congress office-bearers for displaying black flags to the Chief Minister | मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांना पोलिसांनी रोखले

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांना पोलिसांनी रोखले

Next

खेड : रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी रत्नागिरीकडे निघालेल्या खेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथेच रोखले आहे. लोकशाही पद्धतीने निषेधही करू न देणारे हे सरकार हुकुमशाहीचे आहे, अशी टीका काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी केली आहे.

भाजपची महाजनादेश यात्रा आज सायंकाळी रत्नागिरीत दाखल होत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. कोकणातील रस्त्यांच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष खतीब यांच्यासह अनिल सदरे,महमद काझी, बशीर मुजावर, दानिश्ता नाडकर, शराफत लोखंडे व इतर काही कार्यकर्ते रत्नागिरीकडे येण्यासाठी निघाले होते. मात्र या प्रकाराची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना तेथेच अडवले आणि ताब्यात घेतले आहे.

Web Title: Police officers were stopped by the Congress office-bearers for displaying black flags to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.