खेड : रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी रत्नागिरीकडे निघालेल्या खेडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी तेथेच रोखले आहे. लोकशाही पद्धतीने निषेधही करू न देणारे हे सरकार हुकुमशाहीचे आहे, अशी टीका काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी केली आहे.
भाजपची महाजनादेश यात्रा आज सायंकाळी रत्नागिरीत दाखल होत आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. कोकणातील रस्त्यांच्या सद्यस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष खतीब यांच्यासह अनिल सदरे,महमद काझी, बशीर मुजावर, दानिश्ता नाडकर, शराफत लोखंडे व इतर काही कार्यकर्ते रत्नागिरीकडे येण्यासाठी निघाले होते. मात्र या प्रकाराची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्यांना तेथेच अडवले आणि ताब्यात घेतले आहे.