खेड : तालुक्यातील पिरलोटे येथे गोवंश हत्याप्रकरणी झालेली धुमश्चक्री ही कोकणाला लाजिरवाणी बाब आहे. ग्रामस्थांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. नि:शस्त्र आंदोलनकत्यार्ना पोलिसांनी दंडेलशाहीचा वापर करत लाठीचार्जचे आदेश देण्यात आले.पोलिसांची या प्रकरणातील संशयित भूमिका व अक्षम्य दुर्लक्षपणामुळेच लोटेत उद्रेक झाला. याला केवळ पोलिस प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत सर्वच लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी येथील प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून निवेदन सादर करणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले की, पिरलोटे परिसरात गोवंश हत्या होत असल्याच्या प्रकाराबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना याआधी अनेकदा निवेदनाद्वारे कल्पना दिली होती, मात्र याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा या प्रकाराची पुनरावृत्ती प्रजासत्ताक दिनी होत असताना ती ग्रामस्थांनी हाणून पाडली. मात्र पोलिसांनी ग्रामस्थांवरच बेछूट लाठीहल्ला केला, ही बाब निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.गोवंश हत्या प्रकरणात पोलिसांना आलेले अपयश लपवण्यासाठीच लाठीचार्ज केला गेला असल्याचा आरोप जाधव यांनी केला. खरे आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यांना जेरबंद कधी करणार? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी हाती घेतलेल्या धर-पकड मोहिमेत निष्पाप ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करू नये असेही ते म्हणाले.याप्रसंगी मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पिरलोटेतील प्रजासत्ताक दिनी घडलेली हिंसक घटना ही समर्थनीय नाही. मात्र पोलिस प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने हा प्रश्न हाताळल्याने हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता. मात्र या प्रकरणात पोलिसांचीच भूमिका संशयास्पद आहे. त्यांच्या मदतीनेच गोवंश हत्या सुरू असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी बोलताना व्यक्त केला.यावेळी भाजपाचे प्रभारी शशिकांत चव्हाण यांनी गोहत्येचा प्रकार पोलीस प्रशासनाला माहित असूनही त्याकडे दुर्लक्ष करणे अन् त्या मागणीसाठी आंदोलन छेडले जात असेल तर त्यात गैर काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोकणात असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. मात्र पोलिसांनी लाठी हल्ला करून हा प्रश्न धगधगत ठेवला. याला पोलीसच जबाबदार आहेत. पोलिसांवर हात उगारणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र खोटे गुन्हे दाखल करून जे अटक सत्र सुरू आहे ते समर्थनीय नसल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, पोलीस प्रशासनाने गोवंश हत्ये संबंधित आरोपींना २ फेब्रुवारीपर्यंत अटक करा अन्यथा ४ फेब्रुवारी रोजी लोटेतील सर्व ग्रामस्थ पोलिसांच्या दंडेलशाही विरोधात येथील प्रशासनावर धडक मोर्चा काढून निवेदन सादर करतील असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सर्व पक्षिय लोकप्रतिनिधींच्या वतीने दिला आहे. याप्रंसगी अॅॅड. आनंद भोसले, संजय बुटाला, स. तु. कदम, पांडूरंग पाष्टे, रमेश भागवत, सेनेचे राजा बेलोसे, केदार साठे आदी उपस्थित होते.
पोलिसांच्याच पाठीवर लाठी बसणार?, लोटेतील धुमश्चक्रीप्रकरणी सर्वपक्षीय एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:03 PM
खेड तालुक्यातील पिरलोटे येथे गोवंश हत्याप्रकरणी झालेली धुमश्चक्री ही कोकणाला लाजिरवाणी बाब आहे. ग्रामस्थांनी वारंवार पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. नि:शस्त्र आंदोलनकत्यार्ना पोलिसांनी दंडेलशाहीचा वापर करत लाठीचार्जचे आदेश देण्यात आले.
ठळक मुद्देपोलिसांच्याच पाठीवर लाठी बसणार?, लोटेतील धुमश्चक्रीप्रकरणी सर्वपक्षीय एकत्र४ फेब्रुवारीला मोर्चा, पोलिसांवर अक्षम्य दुर्लक्षपणाचा आरोप