रत्नागिरी: अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचा किनारपट्टीवरुन पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारीपट्टी भागातील लोकांनी, मच्छीमारांनी सतर्क राहावे, अशी सूचना पोलीस खात्याकडूनही देण्यात आली आहे.शुक्रवारी सकाळी पोलीस खात्याने किनारी भागात गस्त सुरू ठेवली होती. तसेच किनारी भागात किंवा समुद्रात असणार्या बोटींना पोलीस दलाने चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर किनार्यालगत येऊन थांबण्याचा सूचना दिल्या.पोलिसांनी आपल्या स्पीड बोटीव्दारे समुद्रात जाऊन मच्छीमारांना सावधानतेचा सूचना दिल्या. मिरकरवाडा, जयगड येथे ही मोहीम राबवण्यात आली. वादळादरम्यान ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.अशा स्थितीत मच्छीमारांनी किनारार्यालगत रहावे, असे सूचित करण्यात येत आहे.यावेळी गस्तीनौकेवर पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत, पोलीस उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, रमेश दळवी पोलीस नाईक राहुल गायकवड,पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुर्वे व कर्मचारी उपस्थित होते.
cyclone : चक्रीवादळाबाबत पोलीस दलाकडून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 5:12 PM
cyclone : अरबी समुद्रात तयार होत असलेले तोक्ते चक्रीवादळ १५ आणि १६ मे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचा किनारपट्टीवरुन पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारीपट्टी भागातील लोकांनी, मच्छीमारांनी सतर्क राहावे, अशी सूचना पोलीस खात्याकडूनही देण्यात आली आहे.
ठळक मुद्देचक्रीवादळाबाबत पोलीस दलाकडून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारामिरकरवाडा, जयगड येथे राबवण्यात आली मोहीम