शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: 'निवडणूक आयोग डेटा अपडेट करत नाहीय', हरियाणाच्या निकालांवर काँग्रेसचा मोठा आरोप
2
'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती
3
विनेश फोगट, इल्तिजा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आघाडीवर की पिछाडीवर? वाचा सविस्तर निकाल
4
Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?
5
हरयाणात विचित्र परिस्थिती! मतांमध्ये काँग्रेस आघाडीवर, पण जागांमध्ये भाजपा
6
Hina Khan : "खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी?
7
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
8
PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स
9
"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक
10
Hero Motorsच्या आयपीओवर मोठी अपडेट, कंपनीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या
11
वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीचं सुसाईड; बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल होणार? हायकोर्टाचा निकाल
13
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
14
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
15
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
16
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
17
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अखेर ईडीसमोर हजर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
19
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
20
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु

राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही : नितीन गडकरी

By अरुण आडिवरेकर | Published: March 30, 2023 6:03 PM

श्रीक्षेत्र नाणीज येथे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालय इमारतीचे मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. समाजाची सेवा करणे, दलित, पीडित, शाेषित समाजाची सेवा करणे, गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास करणे, जनतेचे कल्याण करणे हा खरा राजकारणाचा अर्थ आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाणीज (ता. रत्नागिरी) येथे केले.श्रीक्षेत्र नाणीज येथे जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन गुरूवारी (३० मार्च) मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. व्यासपीठावर जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, प. पू. कानिफनाथ महाराज, राज्याचे उद्याेगमंत्री उदय सामंत, माजी आमदार प्रमाेद जठार, ज्येष्ठ पत्रकार उल्हास घाेसाळकर उपस्थित हाेते.गडकरी पुढे म्हणाले की, महाराजांचे हे पीठ केवळ धार्मिक कार्य करणारे नाही. सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात महाराजांनी कार्य केले आहे. गरीबाच्या मुलाला शिक्षण मिळावे यासाठी महाराजांनी संस्थानाच्या माध्यमातून कार्य केले आहे. ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करणे या प्रयत्नातून महाराजांनी शिक्षण संकुलाची निर्मिती केली आहे. या ठिकाणाहून भविष्यातील उत्तम नागरिक तयार हाेतील, ते केवळ जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाही तर भारताचे नाव जगात माेठ करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धर्माच रक्षण करण्याचे माेठ काम महाराजांनी केले आहे.महाराजांनी सर्व दृष्टीने समाजाच्या कल्याणाचा मार्ग संस्कारातून, मूल्यातून, मार्गदर्शनातून, प्रशिक्षणातून, प्रवचनातून सर्वांना दिला आहे. जनतेचा, माेठ्या माणसांचा आशीर्वाद ही आयुष्यातील माेठी पुंजी असते. दीन, दुर्बल, दु:खी लाेकांचे अश्रू पुसण्याकरता, समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता, कार्य करण्याकरता शक्ती द्या, असे शेवटी गडकरी म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitin Gadkariनितीन गडकरी