आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २२ : येथील जिल्हा नियोजन समितीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी २५ जुलैपर्यंत कालावधीत अर्ज घेऊन ते स्वीकारण्याची मुदत आहे. १० आॅगस्ट रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, ११ रोजी मतमोजणी होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. अर्ज प्राप्त होतील त्याप्रमाणे २१ ते २५ जुलैपर्यंत प्रसिध्द होणार आहे. बुधवार, दि. २६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी करण्यात येणार असून गुरुवार, दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता वैध अर्जांची यादी प्रसिध्द होणार आहे. अर्ज फेटाळले गेल्यास शनिवार, २० जुलैपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करता येणार आहे. सोमवार, ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या अपिलावरील अंतिम निर्णय घेण्यात येईल. मंगळवार १ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी ११ वाजता अपिलानंतर वैध अर्जांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. बुुधवार २ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. गुरुवार, ३ आॅगस्ट रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. १० आॅगस्ट रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी १० रोजी मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 5:33 PM