शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती, रत्नागिरीत ‘आनंदोत्सवा’च्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांतच जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 12:50 PM

दोघांमध्ये जोरदार हमरातुमरी तसेच शिविगाळही, एकामेकाच्या कानशिलात लगावली

रत्नागिरी : राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देशभर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे शुक्रवारी (४ ऑगस्ट) दुपारनंतर काँग्रेसचे पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले हाेते. मात्र, क्षुल्लक कारणावरून अचानक दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली आणि दाेघांनी एकमेकांच्या कानशिलात लगावली. या साऱ्या प्रकारानंतर काही पदाधिकाऱ्यांनी मात्र तेथून काढता पाय घेतला.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी राहुल गांधी यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली. या निर्णयानंतर रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथे काँग्रेसचे शहर, जिल्ह्याचे पदाधिकारी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. त्यावेळी प्रदेश पदाधिकारीही उपस्थित होते. राहुल गांधी यांच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी अचानक जोरदार टाळ्या वाजविल्यासारखा आवाज आला. आवाजाच्या दिशेने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नजरा त्याकडे वळल्या. त्यावेळी दोन पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कानशिलात लगावल्याचे लक्षात आले. दोघांमध्ये जोरदार हमरातुमरी तसेच शिविगाळही सुरू होती. भर रस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारानंतर काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वादावर पडदा पाडला. त्यानंतर आनंदाेत्सव साजरा न करताच पदाधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस