खेड : तालुक्यातील पोयनार येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची तालुकाप्रमुख विजय जाधव यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
त्यानुसार प्रभाग क्रमांक १ शाखाप्रमुखपदी राकेश महाडिक, उपशाखाप्रमुखपदी विलास धुमर, प्रभाग क्रमांक २ शाखाप्रमुखपदी वैभव खानविलकर, उपशाखाप्रमुखपदी सुरेंद्र जाधव, प्रभाग क्रमांक ३ शाखाप्रमुखपदी सुनील तटकरे, उपशाखाप्रमुखपदी सिद्धेश विचारे यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपतालुकाप्रमुख अनंत काजारे, सहसचिव संदीप कांबळे, सचिन धाडवे, अपर्णा नक्षे, पूनम जाधव, युवा सेनेचे करण चव्हाण उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य गणेश मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संदीप कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.