देवरुख : सुशिक्षित बेरोजगार जिल्हा कार्यकारिणीची तालुकास्तरीय बैठक संगमेश्वर येथील हॉटेल सनराइज धामणी येथे नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदी देवरुख पाटगाव येथील प्रद्युम्न रवींद्र माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संघटना असावी याकरिता या संघटनेची निर्मिती करण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा आवाज बुलंद करण्याकरिता ही संघटना कार्यरत राहणार आहे. या संघटनेच्या तालुका संघटकपदी देवरुख येथील सागर मांगले, समन्वयक म्हणून संगमेश्वरचे मयूर भिंगार्डे, उपाध्यक्ष म्हणून साखरपाचे प्रथमेश सुर्वे, आरवलीतील सागर दिलीप सावंत तर, सचिवपदी तुळसणीतील अभिषेक गजानन सुर्वे याबरोबरच खजिनदारपदी उमरे येथील प्रिया जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
सदस्य म्हणून साखरपाचे शुभम गांधी, संगमेश्वरच्या शेजल शेरे, माखजनचे देवेंद्र झगडे, हरपुडे सुमित महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीप्रसंगी महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गणेश डांगे, प्रदेश सचिव अभिजित जाधव, प्रदेश संघटक मंगेश माटे, जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्निल शेटे, चिपळूणचे सचिन चव्हाण हे उपस्थित होते.
यावेळी नवीन तालुका कार्यकारणीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन अध्यक्ष प्रद्युम्न रवींद्र माने यांनी सुशिक्षित बेरोजगार सभासदांना बरोबर घेऊन आपण सर्वांच्या अडीअडचणी सोडविण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.
200921\350120210920_170938.jpg
फोटो:सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या संगमेश्वर अध्यक्षपदी प्रद्युम्न माने यांनी निवड, यावेळी सर्व कार्यकारीणी